IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत थरार ! इयत्ता 8 वी मधील कबडीपट्टू मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून; एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचा संशय, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Husband killed his wife by stabbing her with a knife due to suspicion of her character, incident in Yerwada

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या कबडीपट्टू मुलीचा नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून (Murder) केल्याची घटना बिबवेवाडी (Bibvewadi) मधील यश लॉन्स (yash lawns) परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची हत्या (Pune Crime) होत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करीत होते तसेच नागरिक चालण्याचा व्यायाम करीत होते. हा थरार पाहून सर्व जण तिथून पळ आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्षितिजा इयत्ता 8 वी मध्ये शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद (Pune Crime) झाला. त्यावेळी त्याने तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले.

सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली.
अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिचा खून केला आहे. धडापासून मुंडके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते.
खून केलेला कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून आरोपी पसार झाले.
घटना घडण्याच्या थोडावेळ आधीच पोलिसांची (Pune Police) गस्त घालणारी गाडी तिथून गेली होती.
तरीदेखील एवढी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

दरम्यान, आरोपीकडे पिस्तुल देखील होते. ते त्याला गुन्हा करतेवेळी काढता आले नाही.
ते पिस्तुल त्याने तेथेच टाकून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :-  Pune Crime | Thrill in Pune’s Bibwewadi! 8th class Kabaddi player girl stabbed to death with a scythe; Suspicion that the incident happened out of one-sided love, huge excitement

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीचा खून करुन मृतदेह पुरला; पुण्याच्या दौंड येथील घटना

Pune Corporation | पुणे महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी ई-मोटारी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी

Multibagger Stock | 4 रुपये 81 पैशावरून 787.40 रुपयावर पोहचला हा शेयर ! 1 लाख झाले 1.63 कोटी रुपये, आली 163 पट जबरदस्त ‘तेजी’

Related Posts