IMPIMP

Pune Crime | माथाडीच्या नावाने खंडणी मागणारा तोतया गजाआड; अ‍ॅट्रॉसिटीची भिती दाखवून प्रत्येक रेल्वे रॅकमागे घेत होता ५० हजार रुपये

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | माथाडी बोर्डाने (Mathadi Borda) सदस्यत्व रद्द केल्यानंतरही माथाडी कामगारांच्या (Mathadi Worker) नावाने प्रत्येक रेल्वे रॅकमागे (Railway Rack) 50 हजार रुपयांची खंडणी (Extortion) मागून ते न दिल्यास अ‍ॅट्रोसिटीची (Atrocity Act) केस दाखल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 2 लाख 90 हजार रुपयांची खंडणी घेणार्‍याला खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Squad) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पप्पु भिवा खरात Pappu Bhiwa Kharat (वय ३६, रा. औंध) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या अधिकार्‍यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६९/२२) दिली आहे. हा प्रकार खडकी रेल्वे स्थानकावरील (Khadki Railway Station) मालधक्का येथे 16 एप्रिल ते 31 जुलै 2022 दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पु खरात हा पूर्वी हमाल संघटनेत काम करायचा. त्याला त्यातून काढून टाकले. माथाडी बोर्डानेही त्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. असे असले तरी खडकी रेल्वे स्थानकावरील मालधक्का (Maldhakka) येथे आलेल्या रेल्वे रॅकमधून माल बाहेर काढण्यासाठी तो प्रत्येक रॅकमागे 50 हजार रुपयांची मागणी करीत असतो. फिर्यादी यांच्या कंपनीकडे महिंद्रा कंपनीचे (Mahindra Company) माल लोडिंग व अनलोडिंग करण्याचे काम मिळाले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पप्पु खरात याने लोडिंग व अनलोडिंगचे कामात 16 एप्रिल, 17 एप्रिल व 7 जुलै रोजी अडथळा निर्माण केला.
त्याने अडथळा निर्माण करु नये,
म्हणून कंपनीकडून त्याला वेळोवेळी 20 -20 हजार रुपये मिळून असे एकूण 1 लाख 90 हजार रुपये दिले होते.
असे असतानाही त्याने 30 ऑगस्ट रोजी अनलोडिंगचे काम थांबवून काम चालू करायचे असल्यास प्रति रॅकला
50 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तुम्हाला काम करुन देणार नाही, तुमच्यावर अ‍ॅट्रासिटीची खोटी केस करतो,
असे म्हणून धमकी दिली व कंपनीकडून 1 लाख रुपये असे एकूण 2 लाख 90 हजार रुपये खंडणी वसुल केली.
तरी त्याचा त्रास सुरुच असल्याने शेवटी कंपनीच्या वतीने फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली.
खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे
(Sub-Inspector of Police Arjun Bendgude) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Totaya Gajaad demanding ransom in the name of Mathadi; Fearing atrocity, every railway rack was withdrawing Rs 50,000 crime news

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, पुण्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण तर ‘या’ भागात पाऊस

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून मारहाण; तरुणाला अटक

Andheri East By-Election | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापलं, भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर

Related Posts