IMPIMP

Pune Crime | आरटीओ अधिकार्‍यास जखमी करून पळालेला आरोपी 2 महिन्यांनी अटकेत

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – रॅपिडो अ‍ॅपद्वारे बेकायदा प्रवासी वाहतूक करताना आरटीओच्या अधिकर्‍यांनी थांबवल्यावर त्यांच्याशी हुज्जत घालून तसेच अधिकार्‍यास जखमी करून पळालेल्या आरोपीला (Pune Crime) अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी त्यास अटक केली. मागील दोन महिन्यांपासून आरोपी (Pune Crime) पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंटू पूर्णचंद्र घोष (रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात बाइक टॅक्सीला बंदी आहे. घोष हा बाइक टॅक्सी घेऊन जात असताना विश्रांतवाडी येथे त्याला आरटीओ पथकाने अडविले. या कारवाईनंतर महिला अधिकारी त्याच्या गाडीवर पाठीमागे बसून त्याला आरटीओ कार्यालयात घेऊन जात होत्या. मात्र, घोष याने सहायक मोटार वाहन निरीक्षक अधिकार्‍यांशी झटापट करून त्यांना जखमी केले आणि पळ काढला.

आरोपींचा शोध घेत असताना तो खडकवासला भागात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.
त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला सापळा रचत खडकवासला भागातून अटक केली.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर,
पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.

Web Title :- Pune Crime | Vishrantwadi Police Arrest Criminal Who Abscond From 2 Months

हे देखील वाचा :

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Nora Fatehi | नोराचा डान्स संपल्यानंतर तिच्या सहकलाकाराने केले असे कृत्य; नेटकरी झाले संतप्त

Pune Pimpri Crime | देहूरोड येथील आरटीआय कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Related Posts