IMPIMP

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

by nagesh
Pune Fire News | 12 shops including Jogeshwari Misal in Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Fire News | नगर रोडवरील (Pune Nagar Road) खराडी (Kharadi) जुना जकात नाका (Kharadi Juna Jakat Naka) उबाळे नगर (Ubale Nagar), महालक्ष्मी लॉन्स (Mahalakshmi Lawns) जवळ असलेल्या जोगेश्वरी मिसळ (Jogeshwari Misal) व त्याच्या बाजूला असलेल्या 12 दुकानांना आज सकाळी भीषण आग लागली. (Pune Fire News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नगर रोडवरील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्ससमोर जोगेश्वरी मिसळ, ३ फर्निचर, २ मोबाईल शॉपी, हॉटेल एस कुमार अशी एकामेकाला लागून दुकाने, हॉटेल आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली (Pune Fire News). अग्निशामक दल व पीएमआरडीए अग्निशामन दलाचे (PMRDA Brigade Pune) एकूण ६ वाहने आग विझविण्याचे काम करीत असून एक तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे धुराचे लोट हे दूरवरुन दिसून येत आहे. या आगीमुळे नगर रोडवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर लागलेल्या आगीमध्ये एकूण 12 विविध प्रकारची दुकाने जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी नाही.

Web Title :- Pune Fire News | 12 shops including Jogeshwari Misal in Kharadi

हे देखील वाचा :

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Related Posts