IMPIMP

Pune Fire News | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 17 सिटर मिनीबसला लागलेल्या आगीत बस जळून खाक

by nagesh
Pune Fire News | The 17-seater minibus carrying the bride and groom caught fire in the blaze

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनीबसने (MH 12 NX 5489) पुण्यातील (Pune Fire News) मुळशी तालुक्यातील भुगाव जवळ अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत मिनीबस जळून (Pune Fire News) खाक झाली आहे. सुदैवाने या गाडीतून प्रवास करणारे सर्व वऱ्हाडी बचावले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या दोन अग्निशमन दलाचे (fire brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारुन आग विझवली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

17 सिटर मिनीबसने हे वऱ्हाडी पिरंगुट कडून हडपसरला (Hadapsar) निघाले होते, अशी माहिती गाडीचे मालक सागर भाग्यवान कवडे Sagar Bhagyaan Kavade (वय-33 रा. धायरी फाटा) यांनी दिली. आग लागली त्यावेळी बसमध्ये 12 लोक प्रवास करत होते. या गाडीत घरगुती वापराचा गॅस सिलेंडर (Gas cylinder) होता. गाडीच्या रेडिएटर जवळून धूर यायला लागल्यानंतर चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणात या गाडीने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, पिरंगुटकडून येणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात (Pune Fire News) आली होती.

ही मिनीबस गाडी मालक यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत होती. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने ही गाडी एकाच जागेवर उभी होती. यामुळे गाडीत बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले नसल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Fire News)

Web Title :- Pune Fire News | The 17-seater minibus carrying the bride and groom caught fire in the blaze

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | ‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ

IPL 2021 Final | आज फैसला ! यंदा विजेतापदाचा मानकरी कोण?, CSK का KKR?

Earn Money | ‘या’ फंडने एका वर्षात दिला 99.68% चा रिटर्न, बनला बेस्ट इक्विटीज प्रॉडक्ट, तुम्ही सुद्धा करू शकता गुंतवणूक

Pune Crime | घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला ‘समेट’साठी वेळ, फारकतीच्या कालावधीत 27 वर्षीय पत्नीवर 32 वर्षीय पतीचा ‘बलात्कार’

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची…’; संजय राऊतांचा सूचक इशारा

Related Posts