IMPIMP

Pune Hormone Hub | पुणे हार्मोन हब: हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे 3 जून रोजी होणार उद्घाटन

by nagesh
Pune Hormone Hub | Hormone Replacement and Wellness Center to be inaugurated on June 3

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Hormone Hub | पाश्चिमात्य देशात ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सेंटरचे’ (Hormone Replacement Therapy Center in Pune) प्रमाण मोठे आहे. पण भारतात आजही ठराविक आजारांवरचे उपचार वगळता इतरत्र पारंपरिक पद्धतीनेच उपचार केले जातात. मात्र, काळाची गरज ओळखून आता भारतातही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सेंटर सुरू होत आहे. (Pune Hormone Hub)

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिच्या उपस्थितीत येत्या ३ जून २०२३ रोजी एफ. सी रोड, पुणे येथे हार्मोन हब (Pune Hormone Hub), हार्मोन रिप्लेसमेंट (Hormone Replacement) आणि वेलनेस सेंटरचे (Wellness Center) उद्घाटन होणार आहे. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत.

हार्मोन हब विषयी बोलताना हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि.चे (Hormone Wellness Clinics Private Limited ) व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर (Dr.Mahesh Brahmankar) म्हणाले, हार्मोन हब म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि वेलनेस सेंटर ही एक अशी अभिनव संकल्पना आहे की, ज्यात आपल्या हार्मोन्स च्या समस्यांवर तज्ञाकडून एलोपथीं उपचार तर होतीलच, परंतु त्यासोबत म्युझिक थेरपी,प्राणिक हिलिंग,कौन्सेलिंग प्रोग्राम्स,आहाराचा सल्ला तसेच लाइफ कोचिंग अश्या ३६० डिग्री दृष्टीकोनातून रुग्णाचा सर्वांगीण उपचार केला जाईल.

इथे रुग्णाला सरसकट ठराविक औषधे किंवा एकसमान उपचार पद्धती न अवलंबता, रुग्णांच्या गरजेनुसार प्रत्येकावर उपचार केले जाणार आहेत. असे ‘हार्मोन हब’ चे संचालक डॉ. विक्रम दोशी (Dr. Vikram Doshi) म्हणाले.

आपल्या शरीरातील ग्रंथी या हार्मोन्स सीक्रेट करत असतात. ज्यामुळे शरीरात शारीरीक, मानसिक असे अनेक अंतर्बाह्य बदल होत आसतात.
राजोवृत्ती, नैराश्य, वंध्यत्व, शारीरिक कमजोरी, उंची खुंटणे, इरेक्टाईल डिसफंक्शन, केस गळणे, अकारण थकवा जाणवणे,
तणाव जाणवणे अश्या अनेकविध समस्या चे निराकरण अभिनव उपचार
पद्धतीने केले जाईल असे संचालक डॉ. सूरज कोडक (एम डी) Dr. Suraj Kodak (MD) म्हणाले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये देखील हॉर्मोन थेरपी ने सकारात्मक बदल घडू शकतात, असे मत ‘हार्मोन हब’ चे
संचालक ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. राकेश नेवे (Dr Rakesh Neve) ह्यानी व्यक्त केले.

हे अश्या प्रकारचे आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलेच हार्मोन क्लिनिक (India’s first hormone clinic) असणार आहे.
येत्या काळात ज्याची पुनरावृत्ती अनेक मोठ्या शहरात करण्याचा आमचा मानस आहे असेही डॉ महेश ब्राह्मणकर यांनी सांगितले.

Web Title : Pune Hormone Hub | Hormone Replacement and Wellness Center to be inaugurated on June 3

Related Posts