IMPIMP

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

by nagesh
Pune Indore Highway Accident | four died on the spot while one injured in car accident at nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Indore Highway Accident | अलीकडे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस घडताना दिसत आहे. नाशिक
(Nashik News) येथे कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात 4 युवकांचा जागीच मृत्यू
(Died) झाला आहे. पुणे-इंदौर महामार्गावर (Pune Indore Highway Accident) येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून हा
अपघात झाला आहे. दरम्यान गाडीने प्रवास करणाऱ्या 5 जणांपैकी एकजण गंभीर जखमी (Seriously injured) आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास
घडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या भीषण अपघातात तौफिक शेख (Taufiq Shaikh), दिनेश भालेराव (Dinesh Bhalerao), प्रवीण सकट (Praveen Sakat), गोकुळ हिरे (Gokul Hire) हे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे (Ajay Wankhede) हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात (Manmad Sub-District Hospital) प्राथमिक उपचार आहेत. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून हा अपघात झाला आहे.

दरम्यान, मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे.

Web Title :- Pune Indore Highway Accident | four died on the spot while one injured in car accident at nashik

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Related Posts