IMPIMP

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार

by nagesh
 Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी निवडणुक आयोगाकडून पोटनिवडणुक
(Pune Kasba Bypoll Election) जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडे (BJP) असलेल्या या
मतदारसंघासाठी एकट्या भाजपमधून पाच नावे प्रदेश स्तरावर कळविण्यात आली आहेत. त्यातील तीन नावे प्रदेशस्तरावरून अंतिम करून पुढे
दिल्लीला पाठवली जातील. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी बोलताना दिली. तर काँग्रेस पक्षात देखील १६ उमेदवार
इच्छुक आहेत. अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. (Pune Kasba Bypoll Election)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आता कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली असून सर्वच पक्ष आपली दावेदारी या जागेवर सांगत आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकट्या काँग्रेस पक्षाकडून १६ उमेदवार इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती आमदार संग्राम थोपटे यांनी घेतल्या. त्यानंतर या सर्व इच्छुकांची नावे काँग्रेस हायकमांडकडे पाठवली जाणार असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी दिली. त्यामुळे काँग्रेस पक्ष ही निवडणुक लढविणार असल्याचे चित्र आहे. मात्र एवढ्या नावांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेस पक्षाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दुसरीकडे, भाजपमध्ये देखील या पोटनिवडणुकीसाठी (Pune Kasba Bypoll Election) इच्छुकांची नावे समोर येत आहेत. यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या स्नुषा स्वरदा बापट (Swarda Bapat), माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar), स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dhiraj Ghate), माजी नगरसेवक अशोक येनपुरे (Ashok Yenpure) यांचीही नाव चर्चेत आहेत.

कसबा पोटनिवडणुकीवर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते
की, भाजपकडून ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही गाफील राहणार नाही.
असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

हे देखील वाचा :

MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Related Posts