IMPIMP

Pune Kasba Peth Bypoll Election | जाती-धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून कसबा मतदार संघातून उमेदवारी; महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत भरला धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज

by nagesh
Pune Kasba Peth Bypoll Election | Against the wall of caste-religion, 'Apala Manus' Ravindra Dhangekar is nominated by Congress from Kasba Constituency; The Mahavikas Aghadi filled Dhangekar's candidature in a show of strength

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच लढणार असून काँग्रेसच्या (Congress) वतीने या मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामदैवत कसबा गणपतीचे (Kasba Ganpati) दर्शन करत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीने कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात विरुद्ध भाजप (BJP) युतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

धंगेकर हे रविवार पेठ (Raviwar Peth), कसबा पेठ परिसरातून सातत्याने ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच दोन वेळा शिवसेना (Shivsena), दोन वेळा मनसे (MNS) आणि एकवेळ कॉंग्रेस चे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून कसबा विधानसभा (Kasba Vidhansabha) लढताना त्यांनी भाजपचे तगडे नेते गिरीष बापट (Girish Bapat) यांना नाकीनऊ आणले होते. अवघ्या ७ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत ही त्यांना लक्षणीय मते मिळाली होती. (Pune Kasba Peth Bypoll Election)

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना काँग्रेस मध्ये आणण्यास अन्य नेत्यांसोबतच काँग्रेसचे पदाधिकारी रोहित टिळक (Rohit Tilak) यांची महत्वाची भूमिका राहिली होती. टिळक यांनी त्यांना सर्वतोपरी मदत पुरवली होती. विशेष असे की यापूर्वी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत टिळक आणि धंगेकर हे समोरासमोर ठाकले होते. त्यांच्यातील मत विभाजनामुळे तत्कालीन आमदार गिरीश बापट यांचा विजय अधिकच सुकर झाला होता. अशातच भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने टिळकांना मानणारा वर्ग धंगेकर यांच्या पाठीशी उभा राहण्याची दाट शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीचा (Pune PMC Election) विचार करता महापालिकेत सत्ता आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) गटाला कसबा मतदार संघातून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी कसबा मतदार संघातील विजय महत्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे देखील पूर्वीपासून धंगेकर यांच्यावर लक्ष आहे. तसेच पूर्वाश्रमीचे शिवसेना आणि मनसे तील गोतावळा आणि मतदार वर्ग देखील धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची चिन्हे आहेत. कुठलाही जात आणि धर्मभेद न करता काम करणारा आपला माणूस म्हणून नावलौकिक असलेल्या धंगेकर यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेस ने ही निवडणूक सिरियसली घेतल्याचे दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, आज सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole),
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
(Ashok Chavan), काँग्रेसचे माजी मंत्री विश्‍वजीत कदम (Vishwajeet Kadam),
ज्येष्ठ आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), संजय जगताप (Sanjay Jagtap),
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Formar MLA Mohan Joshi), शहर अध्यक्ष अरविंद शिंदे
(Arvind Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap),
प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde), माजी उपमहापौर दिपक मानकर (Deepak Mankar),
माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे,
संजय मोरे, राजेंद्र शिंदे, अभय छाजेड यांच्यासह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होेते.
ग्राम दैवत कसबा गणपती येथे आरती केल्यानंतर रॅली श्रीमंत दगडूशेठ गणपती येथे आल्यानंतर गणपतीची आरती केल्यानंतर मंडईतील टिळक पुतळा येथे रॅली विसर्जित करण्यात आली. यानंतर उमेदवारासह प्रमुख नेत्यांनी गणेश कला क्रिडा मंच येथे निवडणुक अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

धंगेकर यांनी घेतली टिळक कुटुंबियांची भेट

धंगेकर यांनी टिळकवाड्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस वंदन केल्यानंतर ते कसबा गणपती येथे रॅलीच्या ठिकाणी आले.
मुक्ता टिळक यांचे पति शैलेश टिळक, चिरंजीव कुणाल टिळक, काँग्रेसचे नेते रोहीत टिळक यांची भेट त्यांनी घेतली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकर यांनी टिळक कुुंटुंबियांची भेट भाजपच्या पोटात गोळा आणणारी ठरणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बागवे पिता-पुत्र नाराज

काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख (Rashid Shaikh) यांची घरवापसी झाली.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये रशिद शेख यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यामुळे कॅन्टोंन्मेंट मतदारसंघामध्ये (Pune Cantonment Assembly constituency) काँग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता.
हा पराभव बागवे यांच्या जिव्हारी लागला होता.
त्यामुळेच आपल्याशी चर्चा न करताच रशिद शेख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने बागवे आणि त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Bagwe) नाराज झाले आहेत.
बागवे हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.
त्यांच्याच उपस्थितीत रविंद्र धंगेकर यांचा २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता.
धंगेकर हे बागवे समर्थक असल्याने त्यांच्या प्रचारापासून दूर राहाणे बागवे यांना राजकियदृष्टया तोट्याचे ठरणारे आहे.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Against the wall of caste-religion, ‘Apala Manus’ Ravindra Dhangekar is nominated by Congress from Kasba Constituency; The Mahavikas Aghadi filled Dhangekar’s candidature in a show of strength

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढव्यात घरात घुसून 54 वर्षीय महिलेचा विनयभंग, पिडीतेच्या मुलांना बेदम मारहाण

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’

Grammy 2023 | रिकी केज यांनी रचला इतिहास; 3 वेळा जिंकला ग्रॅमी पुरस्कार

Related Posts