IMPIMP

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

by nagesh
 Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | aaditya thackeray says people dont go to eknath shinde rally

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) होत आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या दोन्ही जागांसाठी जोरदार तयारी केली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने (NCP) नाना काटे (Nana Kate) तर कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Congress Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. चिंचवडमध्ये महाविकास (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) आघाडीची सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे 40 गद्दार आमदार जिथे जातात तिथे 50 खोक्यांची घोषणा होते. ही घोषणा ऐकल्यावर त्या घोषणा देणाऱ्या कर्यकर्त्याच्या मागे पोलीस पाठवले जातात. त्यांच्या घरावर धाड टाकली जाते. केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) त्यांच्या मागे लागतात. मात्र, राज्यात झालेली ही गद्दारी कोणालाही पटलेली नाही. मुख्यमंत्री आणि 40 आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांच्या पाठित वार केल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आतापर्यंत अनेक आमदार, खासदारांनी पक्षाची विचारसरणी न पटल्यामुळे अथवा कोणत्याही कारणास्तव पक्ष बदलले आहेत. मात्र, या नेत्यांनी रीतसर राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. परत निवडणूक देखील लढवली. परंतु जे राज्यात झाले, तसं राजकारण यापूर्वी कधीही झालं नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले,
आम्ही जातो त्याठिकाणी सभांना मोठी गर्दी होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरातांच्या
(Balasaheb Thorat) सभांना मोठी गर्दी होते. मात्र तुम्ही कधी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभांना गर्दी
झालेली पाहिली आहे का? त्यांच्या सभांना फक्त खुर्चाची गर्दी होते.
आमच्या सभेला जनतेची गर्दी होते तर त्यांच्या सभांना केवळ खुर्चांची गर्दी होते, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | aaditya thackeray says people dont go to eknath shinde rally

हे देखील वाचा :

Pune Crime News | हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना अटक, पाबळमधील उसाच्या रानात पाठलाग करुन ठोकल्या बेड्या

Pune Pimpri Chinchwad Crime | खून करुन मृतदेह फेकला ओढ्यात, महाळुंगे MIDC परिसरातील घटना

Related Posts