IMPIMP

Pune Lok Sabha Bypoll Election | अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यावरुन काँग्रेस आक्रमक, म्हणाले- ‘मवीआत एक्य…’

by nagesh
Pune Lok Sabha Bypoll Election | congress is upset because ncp leader ajit pawar claimed the pune lok sabha constituency

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) हालचालींना वेग आला आहे. परंतु या पोटनिवडणुकीवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Bypoll Election) काँग्रेसच्या वाट्याला जात असतानाही राष्ट्रवादीकडून (NCP) या मतदारसंघावर वारंवार दावा केला जात आहे. यावरुन आता पुण्यातील काँग्रेस (Pune Congress) देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

(Pune Lok Sabha Bypoll Election)  पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाते. मात्र, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या जागेवर दावा केला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला आहे. अजित पवार यांच्या दाव्यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादीला खडेबोल सुनावले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसची आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचं काँग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक्य राहणं गरजेचं आहे,
आमच्या मध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मोहन जोशी यांनी सांगितलं.

काय म्हणाले अजित पवार?

पुणे टिंबर मार्केट (Pune Timber Market Fire) येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी म्हटलं की, मला असं वाटत होतं की पुण्याची पोटनिवडणूक लागणार नाही.
पण, आता बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक लागणार आहे.
मला वाटत होतं की एक वर्ष लोकसभा निवडणुकीला राहिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही.
पण आता निवडणूक लागू शकते. आज इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे.
रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली.
जिथ निवडणूक लागेल तिथे ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी, असंही अजित पवार यांनी म्हटले.

Web Title : Pune Lok Sabha Bypoll Election | congress is upset because ncp leader ajit pawar claimed the pune lok sabha constituency

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘मी आयुष्य संपवतोय…’ मित्राला WhatsApp वर चिठ्ठी पाठविल्यानंतर युवकाने उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक मार्गावर भीषण अपघात, 10 मेंढ्या जागीच ठार

Related Posts