IMPIMP

Pune MNS | पुण्यात मनसेला मोठा धक्का ! 400 मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?

by nagesh
Vasant More | internal dispute in pune mns has come to the fore once again

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमधील (Pune MNS) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच दरम्यान एक
मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील 400 मनसे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे कार्यकर्त्यांनी (Pune MNS)
राजीनामे दिल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे यांच्यासह 400 पदाधिकाऱ्यांनी
मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.

नीलेश माझिरे यांनी माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या आठव़ड्यात पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच माझिरे यांची हकालपट्टी आणि राजीनामा यामुळे पुणे मनसेत (Pune MNS) अलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नीलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदेसमर्थक असल्याने माझिरे यांना माथाडी कामगार जिल्हाध्यक्षपदावरून हटवल्याने
मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकीकडे पक्षबांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत असताना दुसरीकडे पुण्यात 400
मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Web Title :- Pune MNS | big blow to raj thackeray mns in pune nilesh mazire and 400 mns workers leave party

हे देखील वाचा :

D. Pharmacy | डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर

Sanjay Raut | राज्यपालांची चहा बिस्केटे न खाता त्यांना शिवरायांच्या अपमानावर भाजप नेते प्रश्न विचारणार का? – संजय राऊत

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Related Posts