IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका : बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता

by nagesh
PMC JICA Project | Mula Mutha river improvement project contract process completed MP Girish Bapat s follow up a great success

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | जायका कंपनीच्या (Jica Company) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित मुळा – मुठा नदी सुधार योजनेच्या (Mula Mutha Riverfront Development Project) निविदांना (Tender) मान्यता देण्यास जायका कंपनीने तसेच केंद्राने (Central Government) हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच नदी सुधार योजनेच्या (Pune River Rijuvenation Project) निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) मान्यतेस Pune Municipal Corporation (PMC) येऊन लवकरच कामांचा शुभारंभ होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (National River Conservation Directorate), जपानी इंटरनॅशनल को – ऑपरेशन एजन्सी Japan International Co-operation Agency (Jica) व पुणे महानगरपालिकेसोबत Pune Municipal Corporation (PMC) करार केला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाच्या 990.26 कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा 85 टक्के म्हणजे 841.72 कोटी, महापालिकेचा 15 टक्के म्हणजे 148.54 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे.

या प्रकल्पामध्ये 3 पॅकेजेस मुख्य मलवाहिन्या टाकणे व 6 पॅकेजेसमध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (PMC Sewage Treatment Plant) उभारणे याचां समावेश असणार आहे. पॅकेज एक अंतर्गत करण्यात येणारे मलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या पॅकेज चारच्या निविदा (Tender) या जास्त दर असल्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

प्रकल्पाची पुनर्नरचना करण्यासाठी पुणे महापालिकेने ऑगस्ट 2020 मध्ये जायका कंपनीला प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला जायका कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये मान्यता दिली होती.
त्यानुसार नविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
यामध्ये 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधणे व मलवाहिन्या टाकणे या कामाचा समावेश करण्यात आला होता.
तसेच मैलापाणी शुद्धीकरण केंद्र देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या प्रकल्पाच्या कामासाठी 6 निविदा प्राप्त झाल्या होत्या.
प्राप्त झालेल्या निविदांची सल्लागार यांच्यामार्फत छाननी करण्यात आली.
त्याचा अहवाल जायका कंपनीला मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता.
सल्लागार यांनी तीन निविदा पात्र ठरवल्या होत्या.
त्यानुसार एनव्हायरो कंट्रोल (Enviro Control) व तोशिबा वॉटर सोल्युशन – जेव्ही (Toshiba Water Solutions – JV) या दोन निविदा अंतीम छाननीत पात्र ठरल्या आहेत.

Web Title :-  Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation Approval of tenders for much talked about Mula Mutha river Development Project improvement scheme

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीवर कोयत्याने सपासप वार

Corona Vaccines | कोरोना लसींची मुदत संपणार असल्याने 50 हजाराहून अधिक लस वाया जाण्याची भीती

Corporator Avinash Ramesh Bagwe | नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांच्या निधीतून प्रभाग 19 मधील ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन

Related Posts