IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | Vilkas Dhakane appointed as additional-commissioner of pune minicipal corporation pmc

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेमध्ये तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असताना राज्य सरकारने अतिरिक्त आयुक्त म्हणून भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांची नियुक्ती केली आहे. पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) अतिरक्त आयुक्त विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती मिळावी, याकरिता अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती.

पुणे महापालिकेच्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, राज्य शासनाने भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याबाबतचे आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी (दि.2) काढले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विकास ढाकणे यांनी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
मात्र, शासनास आवश्यक वाटले तर त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांना परत
बोलावले जाणार असून, याबाबतचे अधिकार राज्य सरकारने राखून ठेवल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Vilkas Dhakane appointed as additional-commissioner of pune minicipal corporation pmc

हे देखील वाचा :

Pune Crime | मुंढव्यातील सराईत नागपुरे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 112 वी कारवाई

Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

Tukaram Gadakh Passes Away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Pune PMC News | कोरोना काळात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारानंतरही पुणे महापालिकेकडून कारवाई नाही; जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Related Posts