IMPIMP

Pune Municipal Elections 2022 | महापालिका निवडणूक ! 31 मे रोजी गणेश कला क्रिडामंचमध्ये आरक्षण सोडत; प्रशासनाची तयारी सुरू

by Team Deccan Express
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Municipal Elections 2022 | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीची (PMC Elections 2022) आरक्षण सोडत (PMC Elections Reservation Draw) ३१ मे रोजी स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला क्रिडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे होणार आहे. सोडतीसाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून ३० मे रोजी रंगीत तालिमही होणार आहे. (Pune Municipal Elections 2022)

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ रोजी आरक्षण सोडत होणार आहे. अद्यापही ओबीसी आरक्षणाबाबत अनिश्‍चितता असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या ३१ मे रोजी १७३ सदस्य संख्या असलेल्या ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती (Scheduled Castes), अनुसुचित जमाती (Scheduled Tribes) आणि महिलांसाठीच्या ५० टक्के आरक्षीत जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडामंच हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे. अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठया तयार करणे, सोडतीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाईव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रिन बसविण्यात येणार आहेत. आरक्षणांची सोडत चिठ्ठयांद्वारे करण्यात येणार असून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या चिठ्ठया काढण्यात येणार आहेत. सोडतीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने याठिकाणी पोलिस बंदोबस्तासोबतच (Pune Police Bandobast) महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Web Title : Pune Municipal Elections 2022 | PMC election reservation draw at Ganesh Kala Krida manch swargate on 31st May; Administration begins preparations

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts