IMPIMP

Pune Muslim Community | भोंग्यांसंदर्भात पुण्यातील मुस्लीम समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

by nagesh
Pune Muslim Community | pune muslims decide to follow court and maharashtra state government orders over masjid loudspeaker

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Muslim Community | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी नुकतंच मशिदींवरील भोंगे (Loudspeaker On Masjid) काढण्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम (Ultimatum) दिला. यावरुन संपूर्ण राज्यात एक वादंग निर्माण झालं आहे. पुण्यातील भाषणातही राज ठाकरेंनी अल्टिमेटमबाबत पुन्हा बोलून दाखवलं. यावरुनही आरोपांचे सत्र सुरु असतानाच आता पुण्यातील मुस्लीम समाजाने (Pune Muslim Community) मोठा निर्णय घेतला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्यातील आझम कॅम्पस (Azam Campus Pune) येथे मुस्लीम समाजातील (Pune Muslim Community) मंडळींची बैठक पार पडली आहे. यावेळी राज्य सरकारच्या (Maharashtra State Government) नियमांचे पालन केले जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, ‘आम्ही दिवसभरात 5 वेळा नमाज पठण करतो आणि त्याचवेळी अजान होते. ही अजान 7 ते 8 मिनिटांसाठी असते. पण तरीही सध्या जे काही सतत भोंगे किंवा स्पीकरबाबत आवाहन केले जातेय, त्याचा विचार करता न्यायालय आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे यापुढील काळात पालन केले जाईल’. आम्ही या नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचं पी. ए. इनामदार (P.A. Inamdar) यांनी सांगितलं.

पुढे इनामदार म्हणाले, पुणे शहरात (Pune City) साधारण 400 ते 450 मशिदी आहेत. तेथील भोंगे अथवा स्पीकरबाबत नोंदणी करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे, त्यांनी म्हटलं आहे. तसेच, ‘आजवर आपण सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले आहेत. यापुढे देखील साजरे करुयात,’ असं ते म्हणाले, दरम्यान, आजपर्यंत कधीच अशा प्रकारची घटना झाली नाही. यापुढेही आम्ही होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी इक्बाल शेख, मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण, अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी,
अस्लम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. अवामी महाझ सामाजिक संघटनेने ही बैठक बोलावली होती.

Web Title : Pune Muslim Community | pune muslims decide to follow court and maharashtra state government orders over masjid loudspeaker

हे देखील वाचा :

Pune Crime | साखरपुड्यानंतर शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार; चंदननगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

PMPML Bus Supply Contractors Strike | पुणेकर वेठीस ! पीएमपीएमएलच्या बस पुरवठादार ठेकेदारांचा संप; शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम

Related Posts