IMPIMP

Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप

by nagesh
Pune NCP | Distribution of cards of various government schemes in Dattawadi on the occasion of Sharad Pawar's birthday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP ) वतीने पुण्यातील दत्तवाडी येथील तपोभूमी मैदानात आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांच्या हस्ते या कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब योजना, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, रेशन कार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना मीटर वाटप करण्यात आले. पर्वती मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभिजित बारवकर (Abhijit Barwakar) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर (Pune NCP) चिटणीस अभिजीत बारवकर (Abhijit Barwakar) व दिपाली अभिजित बारवकर (Deepali Barwakar) यांनी विविध शासकीय योजनांसाठी (Government scheme) आवश्यक असणारे कार्ड वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शरद पवार यांनी नेहमीच लोकसेवेला प्राधान्य दिलं आहे, आज हा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनाही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटेल, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade), माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर (Ravindra Malwadkar),
नगरसेविका अश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam), नगरसेविका प्रिया गदादे (Corporator Priya Gadade),
पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम (Nitin Kadam), कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलवडे,
शहर प्रसिद्धीप्रमुख अमोघ ढमाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune NCP | Distribution of cards of various government schemes in Dattawadi on the occasion of Sharad Pawar’s birthday

हे देखील वाचा :

Pune Crime | कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

Pune News | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

Related Posts