पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune News | गेले 6 ते 7 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (krushi utpanna bazar samiti pune) आवारामध्ये वाहनशुल्क आकारण्यास (parking charges ) सुरुवात झाली. त्याचा अतिरिक्त आर्थिक भार हा खरेदीदार व इतर घटकांवर पडत होता. त्यामुळे बाजाराकडे खरेदीदाराने पाठ फिरवली. पर्यायाने शेतकऱ्यांचा शेतीमाल न विकला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यास कामगार संघटना, टेम्पो संघटना,आडते असोसिएशन, खरेदीदार यांनी विरोध केला होता व रविवार पासुन त्याकरिता संप पुकारण्यात आला (Pune News) होता.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
त्यासंदर्भात बाजार समितीत आज वार बुधवार सकाळी १२ वाजता बैठक पार पडली. सुरू केलेले पार्किंग शुल्क बाजार समितीने रद्द केल्याचे आज जाहीर केले.
चर्चेअंती नाममात्र प्रवेश शुल्क घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
उद्या सकाळी 8.00 वाजता गणपती मंदिर येथे खरेदीदार आणि टेम्पो चालक यांची बैठक होईल व सदर बैठकीमध्ये किती प्रवेशशुल्क द्यायचा हे ठरेल.
आणि त्या प्रकारचा तसा प्रस्ताव बाजार समितीला देण्यात येईल.
असे यावेळी टेम्पो संघटना व कामगार युनियन च्या वतीने संतोष नांगरे (Santosh Nangare) यांनी सांगितले.
सदर बैठकीस बाजार समितीचे प्रशासक मधुकांतजी गरड व अधिकारी यांच्या समवेत आडते असो.अध्यक्ष विलास भुजबळ,
अमोल घुले, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे राजेंद्र रेणूसे, कामगार संघटनेचे विशाल केकाणे आदी (Pune News) उपस्थित होते.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
Web Title : Pune News | Agricultural Produce Market Committee cancels parking charges in the yard!
Syed Mushtaq Ali Trophy | राहुल द्रविडच्या ‘या’ शिष्याचे धमाक्यात कमबॅक !