IMPIMP

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ; जाणून घ्या दर

by nagesh
Pune Rickshaw Strike | auto rickshaw drivers firm on protest today 12th december pune RTO office news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (Regional Transport Authority) हद्दीत 3 आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ (Increase in autorickshaw fares) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड कि.मी.साठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी 13 रुपये भाडेदर असणार (Pune News) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला (Pune RTO) आहे. ही भाडेवाड पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि बारामती
(Baramati) हद्दीत लागू होणार आहे. यापूर्वी पहिल्या दीड कि.मी.साठी 18 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 12.19 रुपये दर होता.

दि. 8 नोव्हेंबरपासून पुणे (Pune Corporation) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PMC and PCMC) हद्दीत रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. महानगरपालिक क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल.
प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये इतके शुल्क लागू राहील.

ही भाडेसुधारणा 8 नोव्हेंबरपासून पासून लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलिब्रेशन) 8 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबर 2021
पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करुन घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू होईल.
मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाईल.
निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येईल जे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये या मर्यादेत राहील, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे (RTO Dr. Ajit Shinde) यांनी कळवले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Pune News | Auto rickshaw fares increase in Pune, Pimpri-Chinchwad and Baramati from November 8; Find out the rates

हे देखील वाचा :

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,384 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी WIPRO ने रचला इतिहास, गुंतवणुकदारांना केले एका वर्षात ‘मालामाल’

Related Posts