IMPIMP

Pune News | मुदतठेवीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ; साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका, व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश

by nagesh
Central Consumer Protection Authority (CCPA) | government has issued orders against naaptol and sensodyne

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) मुदतठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ दापम्त्यास मुदत ठेव परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेड कंपनीला (Sahil Resort & Spa India Limited) ग्राहक आयोगाने (Consumer Commission, pune) दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतवलेली रक्कम एकूण दहा लाख रुपये साडेबारा टक्के व्याजासह तक्रारदारांना परत करण्याचा निकाल ग्राहक आयोगाने (Consumer Commission, pune) दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख (Pune Additional District Consumer Grievance Redressal Commission Chairman J. V. Deshmukh), सदस्य शुभांगी दुनाखे (Shubhangi Dunakhe) व अनिल जवळेकर (Anil Javalekar) यांनी हा निकाल दिला. या बाबत सुखदा जयंत साठे व जयंत श्रीधर साठे (रा. शुक्रवार पेठ) यांनी ग्राहक आयोगाकडे साहिल रिसॉर्ट अँड स्पा इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात (Sahil Resort & Spa India Limited) तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. ज्ञानराज संत (Adv. Dyanraj Sant) यांनी बाजू मांडली.

तक्रारदार यांनी संबंधित कंपनीकडे २०११-१२ मध्ये एकूण दहा लाख रुपये रकमेच्या विविध ठेवी तीन वर्षांच्या मुदतीसाठी वार्षिक साडेबारा टक्के व्याजदराने ठेवल्या होत्या. मुदतीनंतर या ठेवी व्याजासह परत करण्याचे आश्‍वासन कंपनीने दिली होते. त्यानुसार कंपनीने या रकमेवरील व्याज कधी दरमहा, कधी तिमाही, तर कधी सहामाही स्वरूपात दिले. मात्र, ठेवींची मुदत संपल्यानंतर झाल्यानंतर तक्रारदारांनी गुंतवलेली रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी केली असता, कंपनीने आर्थिक अडचणींचे कारण सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये वकिलामार्फत नोटीस पाठवून मुदतठेवींची मुद्दल व त्यावरील व्याजाची मागणी केली. परंतु, कंपनीने रक्कम परत न केल्याने तक्रारदाराने ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाने या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावली. मात्र, कंपनीकडून कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही. त्यामुळे आयोगाने कंपनीविरुद्ध आदेश काढून प्रकरण एकतर्फी चालवले. तक्रारदारांनी दाखल केलेले शपथपत्र, मुदतठेवींच्या पावत्या, लेखी युक्तिवाद ग्राह्य धरून आयोगाने हा निकाल दिला.

अन्यथा १५ टक्के व्याजाने पैसे द्यावे लागतील :

निकालापासून ४५ दिवसांत ही रक्कम न दिल्यास मुदतठेवीवर पंधरा टक्के व्याज आकारण्यात येईल,
तसेच तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी एक लाख ४० हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी ३५ हजार रुपये देण्यात यावे,
असेही आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे.

Web Title :- Pune News | Avoid refund of term deposit; Order to Sahil Resort & Spa India Limited to return the amount with interest to the Consumer

हे देखील वाचा:

Pune News | आरएमसी प्लांट मालकांचा बंद अखेर मागे, बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन; प्रदीप वाल्हेकर यांची माहिती

Satara Landslide | सातार्‍यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Related Posts