IMPIMP

Pune News | भाजपने संपूर्ण शहरात लावलेल्या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सत्ताधारी BJP ने लावले नाहीत – राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रपुरुषांच्या अपमान करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गदारोळ

by nagesh
Pune NCP | NCP Pune City President Prashant Jagtap On Ruling BJP In Pune Municipal Corporation (PMC) 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने (BJP) संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले. परंतु या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही. त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे (NCP) महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) सर्वसाधारण सभेत (PMC GB) जाहीर निषेध करण्यात (Pune News) आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की, “या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे. भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मत मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो”.

यावेळी “भारतीय जनता पार्टी चा धिक्कार असो”, “जय भवानी, जय शिवाजी”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” या घोषणांनी सभागृह दणाणून (Pune News) निघाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Pune News | Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s photos were not posted by the ruling BJP on hoarding – NCP Prashant Jagtap

हे देखील वाचा :

Varsha Gaikwad – TET Exam | ‘जो कुणी दोषी आढळेल त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल’ (व्हिडिओ)

Cristiano Ronaldo Girlfriend List | अबब…! क्रिस्टियानो रोनाल्डोनं 13वर्षात केलं चक्क 18 गर्लफ्रेंडला डेट, यामध्ये होता ‘या’ भारतीय अभिनेत्रीचा समावेश

MLA Sunil Kamble | ‘सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम’ – आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन

Related Posts