IMPIMP

Pune News | पॅन इंडिया कायदेशीर जनजागृती अभियान व पोहोच मोहीम सांगता समारंभ संपन्न

by nagesh
Pune News | Closing Ceremony of Pan India Legal Awareness Campaign and Reach Campaign

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव अंतर्गत तसेच कायदे विषयक सहाय्य कायद्याची पंचवीस वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने 14 नोव्हेंबर 2021 रोजी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या (Symbiosis) ‘सिंबायोसिस विधि महाविद्यालय पुणे’ (Pune News) येथील एस.व्ही.सी. सभाग्रहात पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती अभियान व पोहोच मोहीमेचा सांगता समारंभ संपन्न झाला. या अंतर्गत सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय पुणेच्या कम्युनिटी लीगल सर्व्हिस अँड लिटरसी सेल (सीएलसीसी) कडून विविध उपक्रम राबवणेत आलेले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत डॉ. आशिष देशपांडे Dr. Ashish Deshpande (सहाय्यक प्राध्यापक सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय पुणे) यांनी केले. सिम्बायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार (Dr. S.B. Muzumdar) यांच्या ‘वसुधैव कुटुम्बकम’चे ध्येय आणि कायदेशीर सहाय्यता प्राधिकरणाच्या ‘सर्वांसाठी न्याय’ या दोन्हीचे एकमेकांना पूरक उद्देश व सहयोगिता, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयाची समाजाभिमुख भूमिका, इत्यादींवर प्रकाश टाकला व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

संजय देशमुख Sanjay Deshmukh (प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश), प्रताप सावंत Pratap Sawant (सचिव, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण), सत्यनारायण नावंदर Satyanarayana Navander (दिवाणी न्‍यायाधिश वरिष्ठ स्तर), गोसावी (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) आणि के. पी. नांदेडकर K. P. Nandedkar (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले व व्याख्यानांची सुरवात झाली.

पहिले व्याख्यान विलास खांडबहाले Vilas Khandbahale (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे) ‘वैकल्पिक विवाद निराकरण प्रणाली’ या विषयी संपन्न झाले. सर्वानी उत्स्फूर्तपणे पर्यायी व्यवस्थेचा स्वीकार करावा आणि त्याचे विविध प्रकार आणि फायदे यावरती भाष्य केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ओम मंत्री (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय) यांनी कायदेशीर विषयक सहाय्य आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम 138 या वरती व्याख्यान दिले. कायदेविषयक सहाय्याचे संविधानिक महत्व, महत्त्वाचे निवाडे, विशेषतः हुसेनरI खातून विरोधी बिहार सरकार, गरज आणि सरकारने दुर्बल घटकांच्या उत्तम भवितव्यासाठी सुरू केलेल्या विविध योजना आणि जिल्हा व राज्य कायदेविषयक सहाय्य प्राधिकरणाची भूमिका , तसेच निगोशिएबल इन्स्ट्रेमेन्ट ऍक्टमधील कलम 138 ची पार्श्वभूमी, विविध सुधारणा, धनादेश न वठणे बाबतची कायदेशीर प्रक्रिया आणि शिक्षा यावर मीमांसा केली. (Pune News)

त्यानंतर अतुल टेकाळे (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय) यांनी ‘महिला सबलीकरण’ भारतीय संस्कृतीतील पुरुष प्रधान संस्कृतीची मूल्ये, पुरुषांचे वर्चस्व, शिक्षणाचा अभाव, इत्यादी बाबींवर मीमांसा केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

प्राध्यापक डॉ शिरीष कुलकर्णी (सिम्बॉयसिस विधी महाविद्यालय पुणे) यांनी पुणे जिल्हा कायदेविषयक सहाय्य्यता प्राधिकरण केंद्र सोबत सुरु असणाऱ्या विविध योजना कश्या फलदायी होत आहेत याबद्दल कृतगयता व्यक्त केली. प्रामुख्याने येरवडा कारागृहातील कैद्यांच्या हक्काबद्दल आयोजित केलेले प्रशिक्षण, मानसिक दुर्बल रुग्णांसाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण, विद्यार्थी व शिक्षकांच्या संवर्धनसाठीचे उपक्रम, विविध योजना बद्दलचे प्रबोधन, इत्यादींवर प्रकाश टाकला.

सत्यनारायण नावंदर (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे जिल्हा व स्तर न्यायालय) यांनी
नालसाचे ध्येय हे ज्या व्यक्तींना न्याय मिळू शकत नाही अश्या दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी आहे
असे नमूद केले. जिल्हा विधी प्राधिकरणाने जास्तीत जास्त विधी महाविद्यालय सोबत संलग्नता
वाढवून नालासाचे ध्येय पूर्ण करावे असे सुचवले. त्यामुळे कायद्याच्या विद्यार्थ्यांना
सुरवातीपासून विविध संस्थांची ओळख होईल आणि त्यांचा विधी व्यवस्थेमध्ये सहभाग होईल.
तसेच सिंबायोसिस विधी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यानंतर के.पी. नांदेडकर (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय)
यांनी भारतातील कायदेविषयक जनजागृती यावर भाषण केले.
भारतातील लोकांना मोफतचे शिक्षण किंवा जनजागृतीचे महत्व नाही अशी खंत व्यक्त केली.
भारतातील बहुतेक कायदे इंग्लिश भाषेतून आहेत आणि तोच मोठा अडथळा आहे असे ते म्हणाले.
तंत्रज्ञाची तुफान घोडदौड, वेगाने होणारे समाज परिवर्तन आणि त्यामानाने या सर्वांसाठी असणाऱ्या कायद्य…

Web Title :- Pune News | Closing Ceremony of Pan India Legal Awareness Campaign and Reach Campaign

हे देखील वाचा :

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण

JanDhan Account | खुशखबर ! जनधन खात्यात नसेल बॅलन्स तरीसुद्धा काढू शकता 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

Nashik Crime | भाजपा मंडल अध्यक्षाची सपासप वार करुन हत्या; प्रचंड खळबळ

Related Posts