IMPIMP

Pune News | आ. मुक्ता टिळक यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

by nagesh
Pune News | Come on. Free health check-up camp on behalf of Mukta Tilak

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | कोरोना संकटकाळात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच घटकांनी उत्तम काम केले असून नागरिकांना मदतीचा हात सामूहिकपणे दिला गेला.  हे कौतुकास्पद आहेच. शिवाय सरकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्यात हातभार लावावा, असे आवाहन खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी केले. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक (mla mukta shailesh tilak) यांच्या वतीने आणि कसबा विधानसभा महिला मोर्चाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या (free health checkup) उद्घाटनप्रसंगी बापट बोलत (Pune News) होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी आ. टिळक यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे (uma khapre), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane),पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे (rajesh yenpure), युवा मोर्चा शहराध्यक्ष बापू मानकर (Bapu Mankar) ,कसबा भाजप अध्यक्ष प्रमोद कोंढरे (pramod khandare),सरचिटणीस राजेंद्र काकडे (Rajendra Kakde), छगन बुलाखे, कसबा महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे, स्थानिक नगरसेवक अजय खेडेकर,आरती कोंढरे,सम्राट थोरात विजायलक्ष्मी हरिहर युवा मोर्चा अध्यक्ष कसबा अमित कंक प्रणव गंजीवाले ,अनिल बेलकर,संजयमामा देशमुख, अरविंद कोठारी,कल्याणकुमार गुजराथी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.

बापट पुढे म्हणाले, ‘किती काम केले यापेक्षा अजून किती काम करणे बाकी आहे, याचा विचार कार्यकर्त्यांनी करायला हवा.
लाभार्थ्यांची संख्या वाढवताना योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि लाभार्थींना लाभ मिळवणून देण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी’.
आ. टिळक म्हणाल्या, ‘महिलांच्या आरोग्याबाबत सर्वांनीच अधिक सतर्क असणे आवश्यक आहे.
महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, आजारांबाबत लवकर निदान आणि लवकर उपचार व्हावे,
यासाठी असे शिबीर महत्त्वाचा भाग ठरतात. आगामी काळातही असे महिलांना उपयोगी ठरतील अशी शिबिरे भरवण्याचा मानस असून
याला महिला वर्गाचा प्रतिसाद नक्कीच मिळेल’ भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष खापरे म्हणाल्या, ‘आ. टिळक यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य,
आवश्यक आणि अनुकरणीय आहे. अशी शिबिरे सातत्याने भरवण्यात येणे गरजेचे असून यात भारतीय जनता पक्ष (BJP) कुठेही कमी पडणार नाही’.

या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या सरचिटणीस आरती तांबे,वर्षा धोंगडे,आशा शिंदे,सुषमा खटावकर ,कल्याणी नाईक वैशाली नाईक दीपा मारटकर यांच्या सह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी (Pune News) केले.

Web Title :- Pune News | Come on. Free health check-up camp on behalf of Mukta Tilak

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Police Crime Branch | पुण्यात बसमध्ये प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

Related Posts