IMPIMP

Pune News | गौतमी पाटीलची क्रेझ…तरीही तमाशालाच मायबाप प्रेक्षकांची पसंती

by nagesh
Pune News | Gautami Patil's craze... still Tamasha is the favorite of audience

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune News | सद्या गावो गावी यात्रांचा उत्सव सुरू आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती, कुस्ती, विविध कार्यक्रम आणि तमाशाचे (Tamasha) आयोजन केले जाते. त्यात तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथे यात्रेनिमित्त (Narayangaon Yatra) तमाशाच्या राहुट्या दाखल झाल्या आहेत. दरवर्षी ३५ राहुट्या या यात्रेत असतात. आतापर्यंत जवळपास सात ते आठ कोटींची उलाढाल या तमाशा पंढरीतून झाली आहे , अशी माहिती तमाशा मालक अविषकरा अविष्कार मुळे यांनी दिली. तसेच सद्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचा देखील तमाशावर काही परिणाम झाला नसल्याचे देखील त्यांनी संगितले. (Pune News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गाव ज त्रांमध्ये तमाशाला आजही मागणी आहे. आपली लोककला जपण्यासाठी तमाशा जिवंत राहणे गरजेचे आहे. नारायणगाव येथे दहा दिवस यात्रा असते. या दहाही दिवस येथे तमाशा नागरिकांसाठी आयोजित केला जातो.

गौतमी पाटीलची क्रेझ

तमाशाला पर्याय म्हणून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला नागरिक पसंती देत आहेत. सगळ्या राज्याला तिने वेड लावल आहे. मात्र अनेक तमाशा कलांवत गौतमी पाटील हिला तमाशा कलावंत मानत नाहीत. उलट गौतमी पाटील (Gautami Patil) हीच्यामुळे आजची तरुण पिढी भरकटत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या क्रेझचा कुठलाही परिणाम तमशावर झाला नसल्याचे आखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी सांगितले. (Pune News)

तमाशावर नागरिकांचे प्रेम

तमाशा ही आपल्या महाराष्ट्राची महत्वाची लोक कला आहे. अगदी पेशवाई पासून ही कला जोपासली जात आहे. अनेक कलाकारांना यात जगण्याची उमेद मिळाली आहे. आजही अनेक जण तमाशा वर नितांत प्रेम करणारा प्रेक्षक आहे. त्यामुळे तमाशा कधी मरू शकत नाही, मरणार नसल्याची भावना तमाशा कलावंत व्यक्त करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोरोणानंतर पुन्हा उभारी….

नारायणगाव येथे अनेक वर्षांपासून तमाशा जोपासला जातो. राज्यभरातून राहुट्या या ठिकाणी दाखल होत आहेत.
दरवर्षी मोठी उलाढाल या ठिकाणी होत असते. कोरोना नंतर तमाशाला वाईट दिवस आले होते.
मात्र आता गेल्या दोन वर्षांच्या काळात तमाशाचे पुन्हा उभारी धरली आहे.
त्यातच वाढत्या महागाईमुळे तमाशा कलावंतांना कर्ज घेऊन कार्यक्रम करावे लागत आहेत.

गावा गावात तमाशे होण्यासाठी आणि ही लोककला गाव पुढारी पुढे येत असून तंमाशा होण्यासाठी पुढाकार
घेत आहेत. त्यामुळे नारायणगाव येथे आतापर्यंत सात ते आठ कोटींची उलाढाल झालेली पहायला मिळत आहे.

Web Title :- Pune News | Gautami Patil’s craze… still Tamasha is the favorite of audience

हे देखील वाचा :

WhatsApp Feature | WhatsApp वर नवीन फिचर, वाढणार ग्रुप Admin ची पॉवर; मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी

Chandrapur Crime News | माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यासह आणखी एकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; चंद्रपूरमधील घटना

Related Posts