IMPIMP

Pune News | हजारो महिलांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी मातेची महाआरती

by nagesh
Pune News | Maha Aarti of Shri Lakshmi Mata in the presence of thousands of women

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune News | सहकारनगर परिसरातील (Sahakar Nagar) हजारो महिला व माता भगिनींच्या उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) व स्वाती विक्रम कुमार यांच्या हस्ते काल सायंकाळी सहकारनगर- शिवदर्शन येथील श्री. लक्ष्मी मातेची महाआरती करण्यात (Pune News) आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक उल्हासदादा पवार (ulhas pawar) व अनुराधा पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला कॉग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, वास्तुविशारद राजवाडे आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते व माजी महापौर अंकुश काकडे यांच्या पत्नी ज्योती काकडे, स्मिता केंजळे, वैशाली निकम, संगिता मंत्री, नीलम कडूसकर, मनीषा निंबाळकर, किराड,
सुजाता निम्हण आदीही महाआरतीला उपस्थित होत्या.
पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या (pune navratri mahotsav) अध्यक्षा जयश्री बागुल (Jayshree Bagul) यांच्या हस्ते या सर्वांच्या ओट्या भरून सन्मान करण्यात आला.

अष्टमी निमित्त आयोजित केलेल्या या महाआरतीला परिसरातील माता भगिनी पंचारतीसह सहभागी झाल्या होत्या.
त्यांच्या कडील तबकात लावलेल्या दिव्यांच्या मंद प्रकाशात सर्व मंदिर उजळून निघाला होता.
मंदिर परिसरात भाविकांनीही मोठी गर्दी केली असली तरी करोनाचे सर्व निर्बंध पाळण्याकडे आयोजकांचा कल होता.

शिवदर्शन परिसरात माता लक्ष्मीचे पेशवेकालीन मूलस्थान आहे. 27 वर्षापूर्वी त्याचा जिर्णोद्धार करण्यात आला.
येथे दाक्षिणी वास्तुकलेवर आधारीत सुंदर कलाकुसरीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली.
मंदिराचे प्रवेश द्वारही याच पद्धतीच्या रेखीव नक्षीकामाने सजलेले आहे. तेव्हापासून पुणे नवरात्रो महोत्सवालाही सुरुवात करण्यात आली.
27 वर्षापासून साजरा होणाऱ्या या उत्सवात करोनामुळे काही काळ खंड पडला असला तरी करोनाचे संकट दूर होताच तो पूर्वीच्याय दिमाखात सुरु करण्यात येईल.
असे या उत्सवाचे आयोजक व अध्यक्ष आबा बागुल (Aba Bagul) यांनी सांगितले.
(Pune News) महाआरतीनंतर मंदिराच्या आवारात आयोजित केलेल्या भोंडल्यामध्ये व गरबा नृत्यातही असंख्य महिला व भाविक सहभागी झाले होते.

Web Title : Pune News | Maha Aarti of Shri Lakshmi Mata in the presence of thousands of women

हे देखील वाचा :

Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

NCB च्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा नवीन गौप्यस्फोट, केले अतिशय गंभीर आरोप (व्हिडीओ)

Related Posts