IMPIMP

Pune News | पुण्यातील मार्केट यार्ड सोमवारी बंद !

by nagesh
Pune Market Yard | Market yard (fruit, vegetable, flower market) in Pune will be closed on Anant Chaturdashi, 'Farmers should not sell farm produce

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनलखीमपुर येथील शेतकरी हिंसाचाराच्या (Lakhimpur farmer violence) निषेधार्थ पुण्यातील (Pune News) मार्केट यार्ड सोमवारी (दि.11) बंद (Market yard close) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी (दि.9) सकाळी 11 वाजता शारदा गजानन मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुण्यातील (Pune News) अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लखीमपुर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केट यार्ड मधील सर्व संघटनांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देऊन मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात (Pune News) आला. यावेळी लखीमपुर येथील शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे (Shri Chhatrapati Shivaji Market Yard Workers Union)
सचिव संतोष नागरे (Secretary Santosh Nagre), विजय चोरगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, विशाल केकाने, दीपक जाधव,
भरत शेळके, दत्तात्रय गजघाटे, विकास थोपटे, सूर्यकांत चिंचवले, गणेश शिर्के, विजय सोनवणे, किसन गोविंदवाड, तुकाराम लिमकर,
सदाशिव मरगळे, टेम्पो पंचायतीचे गणेश जाधव (Tempo Panchayat Ganesh Jadhav), चंद्रकांत जवळकर, सुरेश टक्कर, राजू रेणुसे,
तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट, प्रवीण पाटील, संतोष ताकवले, किशोर भानूसगरे,
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन चे विवेक ओंबासे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे व कामगार उपस्थित होते.

Web Title :- Pune News | Market yard in Pune closed on Monday!

हे देखील वाचा :

PM Kanya Ashirwad Yojana | सरकार पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत मुलींना खरंच 2000 रुपये देत आहे का? जाणून घ्या सविस्तर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | कॉर्पोरेट ट्रेनिंग देणाऱ्या व्यावसायिक महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली 30 लाखांना

Related Posts