IMPIMP

Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील (व्हिडीओ)

by nagesh
Pune News | Our 'strength' only if we fight together as Mahavikas Aghadi - Jayant Patil (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune News | महाविकास आघाडीमधील (maha vikas aghadi) तिन्ही घटक पक्षांची ताकद मोठी आहे. नुकतेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत (ZP Elections) वेगळे लढल्याने काही ठिकाणी पराभव झाला. आम्ही तिघेही एकत्र लढलो तरच ताकद जास्त होते, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांत (municipal corporation) जिथे शक्य असेल तिथे आघाडी म्हणून लढू, असं राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले (Pune News) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोना महामारीची परिस्थिती कमी झाल्याने सरकारकडून राज्यातील मंदिरे आजपासून खुली करण्यात आली आहेत.
जयंत पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती (shrimant dagdusheth ganpati) येथे दर्शन घेत आरती केली.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंदिरे उघडण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे.
त्याचा आम्हाला आनंद असून या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याचं पाटील यांनी पुण्यात (Pune News) सांगितले.

भाजपचा (BJP) आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम आहे.
आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना न्यायालयाने न्याय दिला.
उलटपक्षी लखीमपूर (lakhimpur kheri) येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्याकांडाला भाजप जबाबदार असून त्यामुळे शेतकरी पेटून उठला आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी जरंडेश्वर साखर कारखान्या संदर्भात केलेल्या आरोपांवर विचारलं असता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कशाचीच कागदपत्रे दडवली नाही ते कधी कुठलीच कागदपत्रे लपवत नसल्याचं पाटील म्हणाले.

Web Title : Pune News | Our ‘strength’ only if we fight together as Mahavikas Aghadi – Jayant Patil (Video)

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार

IBPS | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारी बँकांमध्ये 7855 क्लर्क पदांसाठी आयबीपीएसकडून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या

Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यापार्‍याकडे 2 लाखाच्या खंडणीची मागणी; हॉटेल ‘हयात रिजेन्सी’ मध्ये विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघांना अटक

Related Posts