IMPIMP

Pune News | पुण्याच्या प्रामाणिक लॉन्ड्री चालकाचं कौतुक ! इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यात मिळालेले 6 लाखांचे दागिने केले परत

by nagesh
Pune News | pune laundry man returns gold ornaments worth rs 6 lakh to customer who forgot in coat wallet

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुण्यातील (Pune News) एका लॉन्ड्री चालकाने तब्बल लाखो रुपये किंमत असलेले दागिने (Gold
Ornaments) ग्राहकाला परत केले आहे. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिकणामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे. इस्त्री साठी दिलेल्या कोटमध्ये
तब्बल 6 लाखांचे दागिने (6 lakh Jewellery) होते. सोन्याच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे ते दागिने लॉन्ड्री चालकाने परत केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे 6 लाख रुपयांचे दागिने परत करून अमराठी लॉन्ड्री चालकाने प्रमाणिकपणा दाखविला आहे. तर, व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया (Ashok Kanojia) यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिल्यानंतर मंगळवारी इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर त्यांना घरी नेऊन दिले. त्यावेळी ते सोन्याचे दागिने मिळत नसल्याने हतबल झाले होते. त्यांना कपड्यासह सोन्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी जीव भांड्यात पडला. असं शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) (वय 28, रा. हांडेवाडी रोड, न्हावले नगर, पुणे) याने सांगितलं. (Pune News)

राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) यांनी सांगितलं की, ”6 लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. मागिल ३ वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करीत असून, परिसरातील सोसायट्यातून कपडे आणून इस्त्री आणि ड्रायक्लीन करून देत आहे. आतापर्यंत कोणाच्या पैशालाही धक्का लावला नाही. कष्टाची कमाईच समाधान देते.”

Web Title : Pune News | pune laundry man returns gold ornaments worth rs 6 lakh to customer who forgot in coat wallet

हे देखील वाचा :

BS Yediyurappa’s Granddaughter Suicide | कर्नाटकचे माजी CM येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या; सर्वत्र खळबळ

Multibagger Stock | ‘या’ 55 रुपयांच्या शेयरची कमाल, 1 लाखाचे झाले 69 लाख रुपये

Latur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर महामार्गावरील थोरलीवाडी पाटीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Related Posts