IMPIMP

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

by nagesh
Pune News Special children had fun and enjoyment while painting

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune News | आर्मी वेलफेयर असोसिएशन (Army Welfare Association) (आवा) अंतर्गत विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या आशा स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Amrit Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घर तिरंगा अभियानाचा संदेश प्रसार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शर्मा (Pallavi Sharma) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Pune News)

विशेष मुलांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देश्याने स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा (Painting Competition) आयोजित करण्यात आली होती आणि प्रत्येक मुलास पारितोषिक देण्यात आले. सदर शाळेत एकूण 35 विशेष मुले आहेत. त्याचप्रमाणे स्वतंत्रता दिवसानिमित्त स्कूलमधील विशेष शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली.

Web Title :- Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :

Related Posts