IMPIMP

Pune News | बिबवेवाडीतील ESIC रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार; केंद्रीय मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांचे आश्वासन

by nagesh
MLA Madhuri Misal | pune parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | बिबवेवाडीतील (Bibvewadi) राज्य कामगार विमा योजना (ESIC) रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री डॉ. भूपेंद्र यादव (Union Cabinet Minister of Labour and Employment Dr. Bhupendra Yadav) यांनी दिले. आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी आज मंत्रालयात यादव यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा (Pune News) केली.

मिसाळ पुढे म्हणाल्या, राज्य शासनाच्या अखत्यारित ससून सर्वोपचार रुग्णालय (Sasoon Hospital) हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय शहरात आहे.
पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यावर मोठा ताण येतो. नवीन सर्वसाधारण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी मोठी जागा आवश्यक होती.
बिबवेवाडीत ईएसआयसीकडे (Bibvewadi, ESIC) १६.५ एकर जागा उपलब्ध असल्याने या जागेत पाचशे खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय व्हावे यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा (Pune News) करीत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) पुढे म्हणाल्या या प्रस्तावाला ईएसआयसीने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली.
त्यानुसार पहिल्या टप्पात नवीन एकशे वीस खाटांसाठी विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
आता दुसर्या टप्प्यात आणखी तीनशे ऐशी खाटा वाढविण्यात येणार आहेत.
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यावरही बैठकीत सकारात्मक (Pune News) चर्चा झाली.

Web Title : Pune News | The rest of the process of ESIC hospital expansion in Bibvewadi will start immediately; Union Minister Dr. Assurance of Bhupendra Yadav sail bjp mla madhuri misal

हे देखील वाचा :

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Ashok Chavan | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरुन अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांना एवढी माहिती कुठून मिळते..

Pune News | कात्रज तलावाजवळील ‘स्मार्ट पदपथाचे’ काम वर्षभरापासून रखडले; अर्धवट कामावरून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा

Related Posts