IMPIMP

Pune News | पुण्यात PMPML बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; चार महिन्यांनी पोलिसांकडून घटनेची ‘उकल’

by nagesh
Pune News | woman died in road accident after fall down from pmp bus while travelling pune crime

पुणे न्यूज (Pune News):  Pune News | पुण्यातील पीएमपीएल बसमधून (PMPML) 4 महिन्याआधी प्रवास करतेवेळी एका महिलेचा दरवाजातून खाली पडल्यानं दुर्देवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र 4 महिन्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला आहे. पीएमपीएल बस ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा अपघात (Accident) झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकणी पोलिसांनी संबंधित ड्रायव्हर (Driver) विरुद्ध गुन्हा दाखल (Pune News) केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत अधिक माहिती अशी, महादेवी गोरख गायकवाड (Mahadevi Gorakh Gaikwad) असं मृत महिलेचं नाव आहे. 29 मार्च 2021 रोजी मृत महादेवी या पीएमपीएल बसमधून प्रवास करत होत्या. वडकी गावाच्या हद्दीतील धनलक्ष्मी वजन काट्यानजीक स्टॉपवर महादेवी यांना उतरायचं होतं. उतरायचं असल्याचं सांगत महादेवी या बसच्या दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी बस चालकाने बसचा दरवाजा देखील उघडा ठेवला होता. तर, धनलक्ष्मी वजन काट्याजवळील बस थांब्यावर बस आल्यानंतर महादेवी यांनी बसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने बस थांबवली नाही. तशीच बस पुढे पळवली. यामुळे महादेवी यांचा तोल गेला आणि त्या बसमधून खाली पडल्या.

दरम्यान, बसमधून रस्त्यावर जोरात आदळल्यानं महादेवी यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) पीएमपीएल बस चालक प्रवीण शिवाजी कड (Driver Praveen Shivaji Kad) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेनं बस थांबवायला सांगून देखील बस न थांबवल्यानं हा अपघात झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Web Title : Pune News | woman died in road accident after fall down from pmp bus while travelling pune crime

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकार देतंय घरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावे लागेल केवळ ‘हे’ काम; जाणून घ्या

Google | द्वारे तुम्ही दरमहा घरबसल्या कमावू शकता 50 हजार रुपये, जाणून घ्या काय करावे?

Maharashtra Unlock | महाराष्ट्र लवकरच होणार ‘अनलॉक’? CM उद्धव ठाकरेंनी आरोग्य मंत्रालयाकडून मागितला सल्ला

Related Posts