IMPIMP

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

by nagesh
Pune News | young man passed away due to heart attack in just 6 days after marriage at yelevasti in baramati taluka pune district

बारामती : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | लग्नाला केवळ 6 दिवस झाले असताना एका नवविवाहितेबरोबर (Newlyweds) नियतीने मोठा खेळ केला आहे. अजून दारासमोरील लग्नाचा मांडवही निघाला नसताना त्याच मांडवात तिला तिच्या नवऱ्याची अंतयात्रा निघताना पाहावे लागले आहे. सचिन ऊर्फ बबलू अनिल येळे Sachin aka Bablu Anil Yele (वय 27, रा.येळेवस्ती, माळेगाव) असे मयताचे नाव असून त्याचा विवाह हर्षदा संतोबा बोरकर Harshada Santoba Borkar (रा. पिपळा जि. परभणी) हिच्याशी 19 नोव्हेंबर रोजी झाला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शारदानगर येथील अनुज गार्डन येथे अतिशय थाटात या दोघांचा विवाह पार पडला होता.
या विवाहानंतर येळे कुंटुबाने परंपरेनुसार देवदर्शन घेतले आणि त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली होती.
मात्र, गुरुवारी पहाटे सचिनला अस्वस्थ वाटू लागले. त्याला हृदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्याचे निधन झाले.

सचिन येळे यांच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
त्याच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण माळेगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Pune News | young man passed away due to heart attack in just 6 days after marriage at yelevasti in baramati taluka pune district

हे देखील वाचा :

Pune Crime | अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेकडून अटक

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले’ – संजय राऊत

Related Posts