IMPIMP

Pune Panshet Flood | पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्यासाठी 3 वर्षाची मुदतवाढ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

by nagesh
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | NCP leader ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis led maharashtra government for neglecting farmer related issue

पानशेतच्या 103 गृहनिर्माण सहकारी सोसायट्यातील २ हजार ९५ पूरग्रस्त सभासदांना होणार निर्णयाचा लाभ


मुंबई : 
सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील पानशेत पुराच्या (Pune Panshet Flood) दुर्घटनेत बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या 103 गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांना (Housing Co-operative Society) भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने (Land Ownership Rights) देण्याच्या कार्यवाहीला तीन वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवार (दि.2) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. मुदतवाढीच्या या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आग्रही होते, त्यांच्या विशेष प्रयत्नामुळेच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा पानशेत पूरग्रस्तांच्या (Pune Panshet Flood) 103 गृहनिर्माण सहकारी सोसायट्यातील 2095 पुरग्रस्त सभासदांना लाभ होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहाच्या सभागृहात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

1961 साली झालेल्या पानशेत पुराच्या (Pune Panshet Flood) दुर्घटनेत पुणे शहर (Pune City) व परिसरातील अनेक कुटुंबे बेघर झाली होती. या पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने आठ पुरग्रस्त वासहती स्थापन केल्या होत्या. या आठ वसाहतीत माळे, ओटे, शेजघरे, गोलघरे व निसेन हट अशा एकूण 3 हजार 988 गाळे बांधण्यात आले होते. सुरुवातीला हे गाळे नाममात्र दराने भाडेपट्ट्याने दिले होते. ज्या पुरग्रस्तांना शासनाने बांधलेल्या गाळ्यांमध्ये जागा मिळालेल्या नव्हत्या अशा 2095 पूरग्रस्तांसाठी 103 गृहनिर्माण संस्था स्थापन करुन 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याने भुखंड देण्यात आले होते.

या गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमीन मालकी नसल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांना मालमत्तेवरील कर्जाचा (Property Loan) लाभ घेता येत नाही, मालमत्ता गहाण ठेवता येत नाही, मालमत्ता शासनाच्या परवानगी शिवाय विकता येत नाही. पानशेत पुरग्रस्तांना भाड्याने देण्यात आलेले गाळे मालकी हक्काने देण्यात आले आहेत, त्याच धर्तीवर या 103 गृहनिर्माण संस्थांना जमीन मालकी हक्काने देण्याबाबत शासनाकडे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांमधील बऱ्याच सभासदांचे भूखंडाबाबत आपसात
दिवाणी न्यायालयात (Civil Court) दावे दाखल (Filed Claims) असून दावे न्यायप्रविष्ठ आहेत. तसेच या प्रकरणाचा निपटारा होण्याचा कालावधी अनिश्चित असल्याने
ज्या संबंधित भूखंडधाराकाने मालकी हक्क मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) अर्ज अथवा प्रस्ताव दाखल केला आहे,
त्यांना दिलासा देणे प्रशासनाला शक्य होत नव्हते. त्यामुळे याबाबतचे कामकाज विहित वेळेत पूर्ण होणे शक्य होत नाही.
तसेच पानशेत पूरग्रस्त बाधीत भूखंडधारकांना मालकी हक्क देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या कामाला तीन वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा 103 गृहनिर्माण संस्थेतील 2095 पूरग्रस्त सभासदांना होणार आहे.

Web Title :- Pune Panshet Flood | Extension of 3 years for lease of land leased to co-operative housing societies affected by Pune Panshet floods

हे देखील वाचा :

Virat Kohli | आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात विराट कोहली झाला ‘बोल्ड’; पाहा व्हिडीओ

Rain in Maharashtra | राज्यात विकेंडनंतर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून Alert

Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

Related Posts