IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | चिंचवड येथे कारमध्ये आढळली लाखोंची रक्कम अन् धारदार शस्त्र, परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | 43 lakh cash found in car in chinchwad pune

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Pimpri Chinchwad Crime | कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या
(Pune Kasba Peth Bypoll Election) रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपार पर्यंत दोन्ही
मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच चिंचवडमध्ये शुक्रवारी (दि.10) एका कारमध्ये तब्बल 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. ही
रक्कम कुणाची आहे आणि कुणी आणली याचा (Pune Pimpri Chinchwad Crime) तपास सुरु आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Bypoll Election) दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाचे (Election Department) अधिकारी तपासणी करत होते. त्यावेळी एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड (Cash) मिळून आली. ही रक्कम कुठे नेली जात होती याची चौकशी सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. एवढंच नाही तर गाडीमध्ये धारदार हत्यारे सापडली असून कार चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणात 33 उमेदवार आहेत. त्यापैकी आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.
त्यामुळे आज कोण कोणते उमेदवार अर्ज माघारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Thackeray Group MLA Sachin Ahir) चिंचवडमध्ये
दाखल झाले आहेत. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rebel Candidate Rahul Kalate) यांची भेट घेऊन
मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. काहीही झालं तरी माघार घेणार नसल्याच्या मतावर कलाटे ठाम आहेत.
जनभावनेचा अनादर करणार नसल्याचीही ग्वाही त्यांनी दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 43 lakh cash found in car in chinchwad pune

हे देखील वाचा :

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

Pune Crime News | खराडी व चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

Related Posts