IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

by nagesh
 Pune Pimpri Chinchwad Crime | illegal posters to wish gangster nilesh ghaywal on birthday fir filed against three person pune pcmc crime news

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ (Gangster Nilesh Ghaywal) याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स पिंपरी चिंचवड शहरामध्ये लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर्स लावणाऱ्या अतिउत्साही (Pune Pimpri Chinchwad Crime) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी निलेश घायवळ युथ फाऊंडेशनच्या तिघांवर गुन्हा (Pune Pimpri Chinchwad Crime) दाखल केला आहे. घायवळ याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात बेकायदेशीर बॅनर्स लावल्याप्रकरणी घायवळ टोळीच्या तीन सदस्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप (Nilesh Kaluram Gholap) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ युथ फाउंडेशनतर्फे (Nilesh Ghaiwal Youth Foundation)
पुणे-बेंगलोर महामार्गालत (Pune-Bangalore Highway) चांदणी चौक परिसरात हे बेकायदा बॅनर्स
लावण्यात आले आहेत. हिंजवडी पोलीस आणि पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC)
बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हे अनधिकृत फलक काढून टाकले आहेत.

हिंजवडी पोलिसांनी नीलेश घायवळ युथ फाऊंडेशनच्या (Nilesh Ghaiwal) तीन सदस्यांवर आयपीसी कलम
188 तसेच मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नीलेश घायवळ हा पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुन्हेगार आहे. येत्या काही दिवसांत त्याचा वाढदिवस आहे.
त्यामुळे त्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्समध्ये शुभेच्छूक म्हणून अनेकांचे
फोटो छापण्यात आले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | illegal posters to wish gangster nilesh ghaywal on birthday fir filed against three person pune pcmc crime news

हे देखील वाचा :

Pune Crime News | तोतया पोलीस अधिकार्‍याने मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याचे सांगून केली महिलेकडे शरीरसुखाची मागणी; मागितली दीड लाखांची खंडणी

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Mohan Joshi Pune | ‘पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलल्या’ – मोहन जोशी

Related Posts