Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – निवृत्त विंग कमांडरची वाहन चालकाकडून 40 लाखांची फसवणूक

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | एकटे रहात असलेल्या निवृत्त विंग कमांडर (Retired Wing
Commander) यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या वाहन चालकाने एटीएम कार्ड (ATM Card) तसेच धनादेशावर सह्या घेऊन ३९ लाख ८७ लाख
रुपये बँकेतून काढून घेऊन गंडा (Cheating Case) घातला. त्यांची कार, दागिने, पत्नी दागिने, मुळ मुत्युपत्राच्या लॉकरची चावी घेऊन गेल्याचा प्रकार
समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
करण भाऊसाहेब पाटील Karan Bhausaheb Patil (वय २६, रा. शांतीबन सोसायटी, नर्हे) याच्यावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमितवा अरुणकुमार पाल (रा. विमाननगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९४/२३) दिली आहे. हा प्रकार १ जुलै २०१७ ते २८ एप्रिल २०२३ दरम्यान सुरु होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिले निवृत्त विंग कमांडर अरुणकुमार पाल हे शिंदेनगर (Shinde Nagar Pune) येथे एकटे रहात होते. त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होती. त्यांच्याकडे ऑगस्ट २०१७ पासून करण पाटील हा चालक म्हणून नोकरीला होता. त्याने विश्वास संपादन केल्याने त्यांचे सर्व आर्थिक व्यवहारही तो पहात असे. वडिलांनी त्यांचे एटीएम कार्ड व धनादेश पुस्तक त्याच्याकडे सोपविले होते. पाल यांनी आपले मृत्युपत्र बनविले होते. त्यांना सांभाळण्यासाठी सुधीर मारकी हा केअर टेकरही ठेवण्यात आला होता. बाथरुममध्ये पडून पाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. असे असतानाही करण हा ते झोपले आहेत, बाथरुमला गेले आहेत, असे फिर्यादींना सांगत असे. वडिलांची तब्येत खराब झाल्याने शेवटी त्यांना चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये (Birla Hospital Chinchwad) दाखल केले. तेथे २५ एप्रिल २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.
त्यानंतर २८ एप्रिल रोजी करण पाटील याने फिर्यादी यांना ६ लाख रुपये देऊन तुमच्या वडिलांनी तुम्हाला देण्यास सांगितले. कारण विचारता त्याने काही कारण न सांगता तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी वडिलांचे तीन बँक खात्याची चौकशी केल्यावर करण पाटील याने वेळोवेळी धनादेशाद्वारे तसेच एटीएममधून मोठ मोठ्या रक्ककमा काढल्याचे आढळून आले. त्याने गेल्या ६ वर्षात तब्बल ३९ लाख ८७ हजार ९८४ रुपयांचा अपहार केला. वडिलांची ह्युदाई कार, आई व वडिलांचे सोन्याचे दागिने व वडिलांनी बनविलेली फ्लॅटची कागदपत्रे, मुळ मृत्युपत्र लॉकरची चावी परस्पर गायब केल्याचे आढळून आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Hinjewadi Police Station – Retired Wing Commander cheated of
40 lakhs by the driver
Comments are closed.