IMPIMP

Pune : पुण्यात दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांला नेल फरफटत, घटना CCTV मध्ये कैद (Video)

by bali123
pune-pimpri-chinchwad : two wheeler rider drag traffic police thrilling cctv video

पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन – दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस traffic police कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली होती. त्यावेळी आरोपीने पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीन फरफटत नेले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संजय शेडगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शंकर इंगळे असे जखमी पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.

https://twitter.com/i_am_Ravindra1/status/1398484226274562050?s=20

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार traffic police शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी आरोपी शेडगे दुचाकीवर समोरून आले. त्यावेळी इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन्स आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यांने इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर शेडगे हा इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंगळे यांनी आरोपी शेडगे याचा पाठलाग केला आणि पाठिमागून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस हवालदार इंगळे यांचा हात दुचाकीच्या पाठिमागील फायबरमध्ये अडकला. पण आरोपीने दुचाकी वेगात पळवल्याने इंगळे दुचाकीसोबत फरफटत गेले. या घटनेत इंगळे यांना चांगलचे खरचटले असून फरपटत नेणा-या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts