IMPIMP

Pune Pimpri Crime | अश्लील बोलून 13 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; भोसरीमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Senior citizen stabbed with a spear when he went to settle a fight, FIR against 8 including women; Incidents in various areas

सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याचा जाब
विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) भोसरी येथे सोमवारी
(दि.21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी आदेश वाघमारे (वय-18 रा. भोसरी), वैभव (अंदाजे वय -17 पूर्ण नाव पत्ता माहित नाही), वैभव साखरे (वय-17 रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 354, 354 (अ), 509, 323, 504, 34, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-35) भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी यांची 13 वर्षाची मुलगी घरामध्ये असताना आरोपी वैभव घराजवळ येऊन मुलीला अश्लील भाषेत बोलला.
तसेच मागील तीन महिन्यांपासून आदेश आणि वैभव हे दोघे तिची छेड काढत अश्लील हातवारे करत होते.
हा प्रकार वारंवार घडत असल्याने फिर्यादी यांचे पती याचा जाब विचारण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी आदेश याने त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करुन
जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A 13-year-old girl was molested by speaking obscenities, her father was brutally beaten up for asking her questions; Incident in Bhosari

हे देखील वाचा :

Assembly Elections 2022-2023 | सन 2022-23 मध्ये तब्बल 11 राज्यांमध्ये निवडणुका, जाणून घ्या इलेक्शन जिंकण्यासाठीचे मोदींचे मिशन

Sandeep Khardekar | सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर

Pune News | डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

Related Posts