IMPIMP

Pune Pimpri Crime | हृदयद्रावक ! शाळेत निघालेल्या माय-लेकाच्या दुचाकीचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | an 11 year old school boy died in an accident in pimpri chichwad

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | आईसोबत दुचकीवरुन शाळेत जात असताना एका चारचाकीची धडक दुचाकीला बसली. यामध्ये शाळकरी मुलगा मालवाहू ट्रकच्या खाली सापडला. या भीषण अपघातात मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. हा अपघात (Pune Pimpri Crime) आज (गुरुवार) सकाळी जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नरला झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अथर्व रवींद्र आळणे (वय-11) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. आज सकाळी हर्षदा आळणे या अथर्वला घेऊन दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. शाहूनगरच्या कॉर्नरला स्कुटीला चारचाकी वाहनाची धडक बसली. त्यामुळे स्कुटीवर असलेला अथर्व मालवाहू ट्रकच्या चाकाखाली सापडला. तर हर्षदा दुसऱ्या बाजूला पडल्या. (Pune Pimpri Crime)

या अपघातात हर्षदा किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर अथर्वला ट्रकने काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून हर्षदा यांनी हंबरडा फोडला.
अथर्व असा अचानक आपल्याला सोडून जाईल याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती.
या अपघाताची नोंद भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक आणि चारचाकी चालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | an 11 year old school boy died in an accident in pimpri chichwad

हे देखील वाचा :

Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार

Udayanraje Bhonsle | बुद्धी भ्रष्ट झालीये काय? कोश्यारींना पदावरुन मुक्त करा, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास

Related Posts