IMPIMP

Pune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | महिलांना सोन्याचा मोह असतो. सोन्याचे दागिने, बिस्किटे स्वस्तात देतो, असे कोणी म्हटल्यावर त्या हुरळून जातात. असाच मोह एका ज्येष्ठ महिलेला चांगलाच महागात पडला. त्यांनी अडीच तोळे सोन्याच्या मोहापायी चक्क स्वत:च्या गळ्यातील सोन्याची माळ व अंगठी चोरट्याच्या हवाली केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील तेली आळी येथे घडला.

याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाला वडापाव घेऊन जाण्यासाठी तेली आळी गल्लीमध्ये आल्या होत्या.
त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ‘तुम्ही दिवाळीला कपडे खरेदी केले होते,
त्याचे तुम्हाला अडीच तोळे सोन्याचे बक्षीस लागले आहे. मावळ मार्टमध्ये माझे हिरो होंडाचे दुकान आहे.
तुम्ही माझ्यासोबत चला,’ असे सांगून विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने महिलेला दुचाकीवर बसवून घेऊन गेला.
काही अंतरावर गेल्यानंतर त्याने फिर्यादी यांच्याकडे असलेल्या सोन्याची मागणी करून कच्ची रिसीट बनवून लगेच परत करतो, मग तुम्हाला बक्षीस मिळेल असे सांगून साठ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ व अंगठी घेतली. सराफाच्या दुकानातून रिसीट बनवून आणतो तुम्ही इथेच थांबा असे सांगून आरोपी सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | An elderly woman was tempted by expensive gold, sold jewelery for two and a half tolas and handed it over to a thief

हे देखील वाचा :

Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे

Navneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Nana Patole | ‘ही इंग्रजांची पद्धत, महाराष्ट्र खपवून घेणार नाही’; नाना पटोलेंची मंगलप्रभात लोढांच्या विधानावर टीका, राजीनाम्याची मागणी

Related Posts