IMPIMP

Pune Pimpri Crime | सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिराने पळविले सतरा तोळे सोने; पिंपरी-चिंचवड मधील घटना

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) तयार करुन देण्यासाठी विश्वासाने कारागिराकडे दिलेल्या दोन सोन्याच्या लडींचा अपहार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारागिरावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सराफ व्यावसायिकाची 7 लाख 87 हजार 500 रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 6 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पिंपरी गावातील जयलक्ष्मी ज्वेलर्स (Jayalakshmi Jewellery) येथे घडला.

याप्रकरणी आरोपी रॉनी ताजुद्दीन शेख Rony Tajuddin Shaikh (रा. काळेवाडी, पुणे मुळ. रा. वेस्ट बंगाल-West Bengal) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) आयपीसी (IPC) 406 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत हितेश रमेश दोशी Hitesh Ramesh Doshi (वय-45 रा. आदर्श नगर, काळेवाडी, पुणे मुळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी कारागिर रॉनी शेख याला ऑर्डर प्रमाणे गंठण,
अंगठ्या, चैन, झुमके तयार करुन देण्यासाठी 175 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन लगडी दिल्या होत्या.
मात्र आरोपीने सोन्याचे दागिने तयार करुन न देता फिर्यादी यांनी दिलेल्या सोन्याच्या लडी घेऊन पसार झाला.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक डोळस (PSI Dolas) करत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Seventeen talents of gold were stolen by the goldsmith; Incidents in Pimpri-Chinchwad

हे देखील वाचा :

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

Anil Parab | साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना अटकपूर्व जामीन मंजूर

Amol Mitkari | ‘भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू’ – अमोल मिटकरी

Related Posts