IMPIMP

Pune Pimpri Crime | रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या 5 कामगारांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू 4 गंभीर जखमी

by nagesh
Pune Pimpri Crime | Truck Accident four workers injured one dead on pune-mumbai highway near ravet

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) पांढरे पट्टे मारत (Road Strip)
असताना एका भरधाव ट्रकने पाच कामगारांना धडक (Hit by Truck) दिली. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू (Death) झाला तर चारजण गंभीर
जखमी झाले आहेत. साजिद खान Sajid Khan (वय-25) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत
(Ravet) येथे पहाटेच्या सुमारास झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अपघातामध्ये संदीप कुमार (Sandeep Kumar), प्रल्हाद यादव (Pralhad Yadav), भोला कुमार (Bhola Kumar), अनिल कुमार (Anil Kumar) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, कामगार पहाटेच्या सुमारास रावेत येथे काम करत होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने भारधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पाच कामगारांना धडक दिली.

यामध्ये साजिद खान हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार कामगारांच्या अंगावर उकळता रंग उडाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

Web Title : Pune Pimpri Crime | Truck Accident four workers injured one dead on pune-mumbai highway near ravet

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील घटनेने अजब खळबळ ! ‘एका मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कार मात्र दोघांवर?; पोलिसही चक्रावले

Kolhapur News | मंत्र्याच्या गाडीला वाट करून देताना वाहतूक पोलिसांनं चक्क जीप चालकाच्या कानशिलातच वाजवली (व्हिडीओ)

Related Posts