IMPIMP

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

पोटभाडेकरू ठेवलेल्या स्टॉल धारकांचे परवाने होणार रद्द

by nagesh
Pune PMC News | The 'Crystal' company associated with the ruling MLA has still not paid the salary of the municipal security guards

पुणे : सरकारसत्ता  ऑनलाइन – Pune PMC Action | बिबवेवाडी गावठाण (Bibvewadi Gaothan) येथील क्लाईन शाळेलगत पदपथावरील बांधीव गाळे आज महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) सील केले आहेत. विशेष असे की याठिकाणच्या गाळेधारकांकडे ‘स्टॉल’ चे परवाने असताना बेकायदा बांधकाम केल्याने आज महापालिकेने हे गाळे सील केले असून लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल अतिक्रमण विभागाचे (PMC Encroachment Department) प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी सांगितले.

महापालिकेच्यावतीने बिबवेवाडीतील विविध भागातील स्टॉल धारकांचे (PMC Stall Owner) क्लाईन शाळेलगतच्या पदपथावर पुनर्वसन केले आहे. याठिकाणी साधारण ५१ स्टॉल्स होते. मागील चार वर्षांपुर्वी येथील स्टॉल काढून सलग गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांचे काम बेकायदेशीररित्या करण्यात आल्याबाबत महापालिकेकडे तक्रारी देखिल आल्या आहेत. तक्रारीनुसार चौकशीही करण्यात आली असून यामध्ये संबधितांवर गुन्हे दाखल (Pune Crime) करण्यात यावेत व गाळे पाडून टाकावेत असे चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळेच चार वर्षांपासून महापालिकेने येथील स्टॉलधारकांचे भाडे भरून घेतलेले नाही. अखेर आज महापालिकेने येथील सर्व गाळे सील केले आहेत. (Pune PMC Action)

यासोबतच ई.एस.आय. हॉस्पीटल (ESI Hospital, Pune) पंचदीप भवन येथील १६ गाळे देखिल सील करण्यात आले आहेत. भाडे थकविणे, भाड्याने स्टॉल देणे व अन्य अटींचे उल्लंघन करणे यामध्ये दोषी आढळल्याने हे स्टॉल सील करण्यात आले आहेत, असे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

पोटभाडेकरू ठेवलेल्या स्टॉल धारकांचे परवाने होणार रद्द

महापालिकेने परवाना दिलेले फेरीवाले आणि स्टॉलधारक यांची तपासणी सुरू केली आहे.
महापालिकेने परवाना ज्यांच्या नावे दिला आहे, त्यांनीच तेथे व्यवसाय करणे कायद्याने बंधनकारक आहे.
परंतू अनेक ठिकाणी पोटभाडेकरू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पोटभाडेकरु ठेवलेले स्टॉल आणि फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

Web Title : Pune PMC Action | Illegal conversion of stalls into shop ! Stall holders in Bibwewadi Gaothan in trouble; Pune Municipal Corporation has sealed 67 stalls on Bibwewadi road

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Sterilisations Of Dogs By PMC Pune | भटक्या कुत्र्यांची नसबंदी व उपचारासाठी महापालिकेचा कॅनाईन कंट्रोल ऍन्ड केअर संस्थेसोबत संयुक्त प्रकल्प; नायडू आणि बाणेर येथील डॉग पॉंडमध्ये दरमहा होणार 700 कुत्र्यांची नसबंदी

ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

Related Posts