पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांसाठी डॉक्टर हे देवच होते. डॉक्टरांनी ज्या परिस्थितीत काम केले ते पाहता त्यांना तशी उपमा देणे फार गैरही वाटत नाही. पण जशी या काळात मानवी स्वभावाची चांगली बाजू समोर आली, तशी मानवी स्वभावाची वाईट बाजूही समाजाने पहिली. कोरोना काळातील वाईट बाजूची प्रचिती अजूनही येत आहे. पुण्यात कोरोना काळात शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या ‘रॅपिड अँटिजन किट’ प्रकरणात मोठा घोटाळा (Scam In PMC) झालेला उघडकीस आला आहे. (Pune PMC News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
पुणे महापालिकेच्या डॉ. अरविंद बारटक्के दवाखाना, वारजे येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दवाखान्यात स्वॅब सेंटरवर तपासणीसाठी देण्यात आलेल्या साडेअठरा हजार तपासणी किटपैकी ६० ते ८० टक्के किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री केली. तसेच, गरजू रुग्णांच्या जागी तब्बल ११ हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी करून त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. ३४ लाख रुपयांचा हा घोटाळा आहे, या घोटाळ्यात केंद्रावरील डॉक्टर व कर्मचारी सहभागी असल्याचे वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले आहे. त्यासंबंधी पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले आहे. मात्र, तक्रारदाराच्या मते ही रक्कम ८० ते ९० लाख रुपये इतकी असू शकते. (Pune PMC News)
बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळसुरे यांनी या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. त्यांनी आरोग्य यंत्रणा पोलीस आणि इतर ३२ ठिकाणी या संबंधात तक्रार केली. संपूर्ण प्रकार २०२१च्या जानेवारी ते डिसेंबर महिन्यांदरम्यान घडला आहे. नोंदविलेल्या तक्रारीनुसार वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे, तत्कालीन कंत्राटी तत्त्वावरील स्वॅब सेंटरचे प्रमुख डॉ. ऋषिकेश गारडी तसेच महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यावर या घोटाळ्यात सहभागी असण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत ही बाब सिद्ध झाली आहे.
या प्रकरणाची चौकशी वारजे पोलीस (Warje Police) ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले यांनी केली आहे. केलेल्या तपासामध्ये बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान १८ हजार ५०० रॅपिड चाचण्या केल्याची नोंद आहे. त्यापैकी १६५ जणांना संपर्क करून चैोकशी केल्यावर त्यातील फक्त १८ जणांनी या केंद्रावर तपासणी केल्याचे मान्य केले, तर ३७ जणांचा संपर्क झालेला नाही व ९ जणांनी फोन उचलला नाही यांची संख्या ६४ आहे. या ६४ जणांची चाचणी झाली असे गृहीत धरून पोलिसांनी १६५ मधून ६४ वजा करता १०१ म्हणजेच ६१ टक्के नोंदी पोलिसांच्या तपासात बोगस आढळल्याची नोंद केली आहे. (Pune PMC News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
उपलब्ध माहितीचा वापर करून बारटक्के दवाखान्यात एकूण झालेल्या १८ हजार ५०० रॅपिड तपासण्यांपैकी ६१
टक्क्यांनुसार ११ हजार ३२४ बोगस नोंदी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यानुसार प्रत्येक किटची किंमत ३०० रुपये याप्रमाणे एकूण ३३ लाख ९७ हजार रुपयांचा काळाबाजार झाल्याचे
पोलिसांच्या अहवालात उघड झाले आहे. याचबरोबर दवाखान्यातील ३३ स्टाफचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
त्यापैकी २३ जणांचे मोबाइल क्रमांक बोगस चाचण्यांसाठी वापरले आहेत.
तक्रारदार डॉ. कोळसुरे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आहे आणि मनपाची फसवणूक झाली असल्याचे पोलिसांनी
नमूद केले आहे. तसेच ही एक गंभीर घटना असून, याची अधिक सखोल चैोकशी करून नक्की किती रुपयांची
फसवणूक करण्यात आली आहे. याची खातरजमा करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी,
असा अहवाल वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके
(Senior Police Inspector DS Hake) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar),
आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती (Dr. Ashish Bharti) यांना २७ सप्टेंबरलाच पाठवला आहे.
मात्र, याला दोन महिने लोटले तरीही आरोग्य विभागाकडून त्यावर काही एक कारवाई करण्यात आलेली नाही.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam
Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना