IMPIMP

Pune PMC News | देवाची उरूळी, फुरसुंगी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा दावा

 Pune PMC News | Devachi Uruli, Fursungi Nagar Parishad will generate an income of Rs.300 crore in the first year itself; Former minister Vijay Shivtare's claim

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune PMC News | देवाची उरूळी (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षात बांधकाम परवानगीतून ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून (State Government) या गावांच्या विकासासाठी निधी देखिल मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करत माजी मंत्री व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Shiv Sena Leader Vijay Shivtare) यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून (Pune Municipal Corporation (PMC) वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश ३१ मार्चला राज्य शासनाने काढला. या गावांमध्ये महापालिकेने मोठ्याप्रमाणावर कर आकारणी केली असुन तुलनेने पाच वर्षात कुठल्याच सुविधा न दिल्याने ही गावे वगळावीत, अशी मागणी विजय शिवतारे यांनी राज्य शासनाकडे केली होती. मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अवघ्या चार महिन्यांत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही दोन गावे वगळण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भाने आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे अभिनंदन केले.

 

शिवतारे म्हणाले, की २०१७ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर महापालिकेने जिझिया कर आकारला होता. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष होता.यामुळे गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी चार महिन्यांपुर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लवकरच पुरंदर विमानतळ (Purandar Airport) निर्मितीचे काम सुरू होणार आहे. यामुळे संपुर्ण पुरंदर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकास होईल. याचा लाभ या दोन्ही गावांना होणार आहे. नव्याने होणार्‍या नगर परिषदेला केवळ बांधकाम परवानगीतून ३०० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळेल. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची संधी स्थानीक लोक प्रतिनिधींना मिळणार आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही गावे वगळण्याला होणारा विरोध हा राजकिय असून तब्बल ९९ टक्के स्थानीक नागरिक नगर परिषदेच्या बाजूने आहेत.
गावे वगळण्याच्या बैठकीत सर्वच राजकिय पक्षांनी पाठींबा दिला होता.
मात्र, केवळ मला याचे श्रेय मिळू नये, म्हणून काही मंडळी राजकिय विरोध करत आहेत.
स्थानीक आमदार संजय जगताप यांनी मिळकत कर करतो, असे आश्‍वासन दिले होते.
परंतू ते आश्‍वासनपुर्ती करू शकले नाहीत, अशी टीकाही शिवतारे यांनी केली.

 

महापालिकेत भाजपची सत्ता होती अन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते…
शिवतारे यांनी या प्रश्‍नावर उत्तर देणे टाळले

 

महापालिकेमध्ये मागील पाच वर्षे भाजपची सत्ता होती. तसेच यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Govt)
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. देवाची उरूळी, फुरसुंगी या गावांचा विकास असो अथवा मिळकत कर
कमी करण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची होती. गावांचा विकास झाला नाही किंवा मिळकत कर कमी करण्याचा निर्णय न
होणयास भाजप (BJP) आणि नगर विकास विभाग कारणीभूत आहे का? अशी विचारणा केली असता शिवतारे यांनी उत्तर देणे टाळले.

 

 

Web Title :-  Pune PMC News | Devachi Uruli, Fursungi Nagar Parishad will generate an income of Rs.300 crore in the first year itself; Former minister Vijay Shivtare’s claim

 

हे देखील वाचा :

Maharashtra Govt News | विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

IPL 2023 | गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन आयपीएलमधून बाहेर; उपचारासाठी न्यूझीलंडला रवाना

Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ; जाणून घ्या नवे दर