IMPIMP

Pune PMC News | येरवडा मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हलविणार

by nagesh
Pune PMC News | Changes in the boundaries of the Pune Municipal Corporation! 'Expulsion' of Fursungi and Uruli Deva from the municipality limits, the government announced the revised limits of Pune municipality

सेवानिवृत्तीनंतरही सर्व्हंट क्वार्टर्स ताब्यात ठेवलेल्या ६६ क्वार्टर्स प्रशासन ताब्यात घेणार

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | येरवडा येथील शासकिय मनोरुग्णालयाच्या आवारामध्ये विविध सुधारणा करण्यासोबतच रुग्णालयाच्या जागेवर बेकायदेशीररित्या वसविण्यात आलेल्या ३०० झोपड्या आणि सेवानिवृत्तीनंतरही येथील शासकिय क्वार्टर्समध्ये राहाणार्‍या ६६ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांकडून या क्वार्टर्स रिकाम्या करून घेण्याचे आदेश राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत. (Pune PMC News)

राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी मंगळवारी येरवडा शासकिय मनोरूग्णालयाला भेट देउन प्रशासनातील विविध विभागाच्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये रुग्णालयाच्या सुमारे १५६ एकर क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे व अन्य सुविधांसाठीच्या उपाययोजनांवर प्रामुख्याने चर्चा झाली. अपर मुख्य सचिवांनी संबधित प्रशासनाला विविध आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेली सुमारे अकराशे मीटरची सिमाभिंत बांधणे, रुग्णालयाच्या आवारात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचा बायोगॅस प्रकल्प शास्त्रोक्त पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, मागील नाल्याकडून आवारात येणार्‍या डुकरांच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न करणे, रुग्णालयाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ३०० झोपड्या हलविणे, राडारोडा उचलणे, आवारातील मोकळ्या जागेवर असलेला कचरा उचलण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविणे. तसेच सर्व्हंट क्वार्टर्समध्ये सेवानिवृत्तीनंतरही राहाणार्‍या ६६ कर्मचार्‍यांकडून क्वार्टर्स ताब्यात घेउन गरजू कर्मचार्‍यांना उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहीती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. (Pune PMC News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune PMC News | Illegal huts on the site of Yerawada psychiatric hospital will be shifted

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘संजय राऊत घाण, त्यांच्यामुळे 50 लोक पक्षातून निघून गेले’ – आ. चंद्रकांत पाटील

Ahmednagar ACB Trap | नवीन मीटर बसवण्यासाठी लाच मागणारा वायरमन अटकेत; राजुरी तालुक्यातील प्रकार

Pune PMC News | जी-२० परिषदेसाठी पुणे महापालिकेची लगबग ! शहर सुशोभिकरणासाठी उद्योजक, बँकांची मदत घेणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Related Posts