IMPIMP

Pune PMC News | टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देणार; भूसंपादनाशिवाय पुढील रस्त्याचे काम केले जाणार नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune PMC News | कात्रज – कोंढवा रस्त्याने (Katraj Kondhwa Road) टिळेकरनगर मार्गे येवलेवाडी (Tilekar Nagar Via Yewalewadi) येथील पानसरे नगरकडे (Pansare Nagar, Pune) जाणार्‍या विकास आराखड्यातील (PMC Development Plan) सुमारे दीड कि.मी. लांबी आणि २४ मी. रुंदीच्या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. कात्रज- कोंढवा रस्त्याचा अनुभव पाहाता भूसंपादन झाल्याशिवाय या रस्त्याच्या कामासाठी यापुढील काळात निधी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य तो विचार करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

येवलेवाडीच्या विकास आराखड्यामध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीतील पानसरेनगरकडे जाणारा सुमारे दीड कि.मी.चा २४ मीटर रुंदीचा रस्ता आखण्यात आला आहे. विशेष असे की हा विकास आराखडा भाजपच्या महापालिकेच्या सत्ताकाळामध्ये करण्यात आला आहे. महापालिकेने विकास आराखडा मंजूर केला असला तरी शासनाने अद्याप त्याला अंतिम मान्यता दिलेली नाही. २४ मी. रुंदीच्या या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (Pune PMC News)

या रस्त्याच्या कामासाठी मोठ्याप्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. नियोजीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या बांधकाम साईटस् नियोजन आहे. तर काही ठिकाणी इमारतींची कामेही पूर्ण झाली आहेत. बांधकाम व्यावसायीक परवानगी घेताना एफएसआय अथवा टीडीआरच्या बदल्यात जागा सोडतील मात्र काही नागरिकांचे छोट्या आकाराचे प्लॉटस् देखिल येथे असून काहीठिकाणी शेतजमीन आहे. रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नसतानाही मागील वर्षी महापालिकेने येथील जेथे भूसंपादन शक्य आहे, त्या मधल्या पट्टयातील रस्त्याच्या कामाची २ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा काढून कामही सुरू करण्यात आले आहे. विशेष असे की कात्रज- कोंढवा रस्त्यापासून सुमारे २०० मीटरचे भूसंपादन रखडल्याने येथून केवळ चिंचोळा रस्ता आहे. तसेच पुढे येवलेवाडीकडे जाताना माउंट ब्रिजा सोसायटीच्या अलिकडे शेत जमिनीचे भूसंपादन झालेले नाही. असे असताना मागीलवर्षी निविदा काढून कामही सुरू करण्यात आले आहे.

याठिकाणी भूसंपादन झालेल्या सुमारे १२० मीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील २५० मीटर रस्त्याच्या प्राथमिक कामाला सुरूवात झाली आहे.  या कामापोटी ठेकेदाराला आतापर्यंत १ कोटी ५५ लाख रुपये बिल देखिल अदा करण्यात आले आहे. रस्त्याच्याकडेला पावसाळी गटारे, पदपथाचेही काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान कात्रज- कोंढवा रस्ता ८४ मी. रुंद करण्याचे नियोजन होते.
परंतू भूसंपादनापुर्वीच महापालिकेने सुमारे १७० कोटी रुपयांच्या या कामाची निविदा एका बड्या ठेकेदाराला दिली आहे.
हा बडा ठेकेदार युती शासनातील वजनदार व्यक्तीचा निकटवर्तीय असल्याने त्याला दबावाखाली पोसण्याचे काम
महापालिका मागील सहा ते सात वर्षांपासून करत आहे.
मात्र, या रस्त्याचेही काम भूसंपादनाअभावी रखडत चालल्याने महापालिका प्रशासनाने हा रस्ता
केवळ ५५ मी. रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बाब डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असताना प्रशासनाने भूसंपादन झालेले नसताना टिळेकरनगर मार्गे
येवलेवाडीकडे जाणार्‍या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या विकसनाचे काम कोणाच्या हितासाठी आणि कोणाच्या दबावाखाली हाती घेतले? अशी चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले,
टिळेकरनगर ते येवलेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी डीपी नुसार जागा उपलब्ध आहे.
काही जमीनधारकांनी जागा ताब्यात देण्याची तयारीही दर्शविल्याने सुमारे ३५० मी. रस्त्याचे काम हाती घेतले आहे.
मात्र, कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामध्ये भूसंपादनाच्या अडचणी आल्याने रस्त्याची रुंदी कमी करावी लागली आहे.
त्यामुळे काही भागात रुंदीकरण करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला आहे.
मात्र, नवीन नियोजनामुळे पुढील कामात बदल करावे लागणार असल्याने अर्धवट कामामुळे वाहतुकीला अडचण होत आहे.
या पार्श्‍वभूमीवर कात्रज कोंढवा रोड येथून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देण्यात येईल.
भूसंपादन झाल्याशिवाय पुढील काम हाती घेणार नाही.

Web Title :- Pune PMC News | Priority will be given to land acquisition for road work leading to Yevlewadi via Tilekarnagar; Further road work will not be done without land acquisition – Municipal Commissioner Vikram Kumar

हे देखील वाचा :

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Related Posts