IMPIMP

Pune PMC News | मागील 2 वर्षांत 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वाधीक खोदाई करणार्‍या एल ऍन्ड टी (L&T) कंपनीला पुणे महापालिका प्रशासनाचे अभय?

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration's request to L&T (L&T) company, which has been digging for 24 hours water supply scheme in the last 2 years?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | शहरातील रस्त्यांवरील खड्डयांना कारणीभूत असलेल्या १३ ठेकेदारांना महापालिका आयुक्तांनी काळ्या यादीमध्ये टाकले आहे. परंतू संपुर्ण शहरामध्ये चोवीस तास पाईपलाईनचे काम करताना खोदाई केलेल्या ‘एल ऍन्ड टी’ या कंपनीला मात्र केवळ साधारण दंड आकारून मोकळे सोडले आहे. विशेष असे की, एल ऍन्ड टी कंपनीसाठी (L&T India | Larsen & Toubro) भाजपा- शिवसेना युती शासनाच्या काळातच कोट्यवधींच्या कामासाठी पायघड्या घालण्यात आल्या होत्या. राज्यात सत्ता बदल झाल्यानेच प्रशासनाने त्यांच्यावरील कारवाईचा हात आखडता घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. (Pune PMC News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नुकतेच झालेल्या पावसाळ्यामध्ये शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत त्रयस्थ संस्थेमार्फत रस्त्यांचे ऑडीट करून घेतले. यामध्ये डीफेक्ट लायबिलीटी पिरीयडमधील Defect Liability Period (डीएलपी) रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडलेल्या १७ रस्त्यांचे काम करणार्‍या १३ ठेकेदारांना ६ महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तर या कामावरील अभियंत्यांवरही १५ हजार रुपये दंड व अन्य कारवाई प्रस्तावित केली आहे. विशेष असे की प्रशासनाने डीएलपी मधील १३९ रस्त्यांवर खड्डे पडल्याचा अहवाल तयार केला आहे. परंतू यापैकी १७ रस्ते वगळल्यास १२२ रस्त्यांवर अन्य विभागाने खोदाई केल्याने रस्ते उखडल्याचे निदर्शनास आले आहे. (Pune PMC News)

या १२२ रस्त्यांवर प्रामुख्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईनची कामे झालेली आहेत. पाईपलाईनच्या कामांना महापालिकेनेच खोदाईची परवानगी दिली आहे. मात्र, खोदाईनंतर रस्ते दुरूस्तीची जबाबदारी खोदाई करणार्‍या अर्थात पाणी पुरवठा योजनेचे काम करणार्‍या एल.ऍन्ड टी. या कंपनीचीच आहे. या कंपनीने खोदाई केलेल्या ठीकाणी सिमेंट कॉंक्रीटचे पॅचवर्क केले आहे. डांबरी रस्त्यांवर केलेले हे पॅचवर्क अनेक ठिकाणी निघाले असून एकतर रस्ते खचले आहेत किंवा खड्डे पडले आहेत. अशीच परिस्थिती ज्याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे, तेथील आहे. असे असताना प्रशासनाने एल.ऍन्ड टी. कंपनीला पाठीशी घातले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

२०१४ पासून एल.ऍन्ड.टी कंपनीला पुणे महापालिकेमध्ये पाण्याच्या टाक्या, तसेच संपुर्ण पाणी पुरवठा योजनेची कामे देण्यात आली आहेत. तसेच शहारातील विविध चौकांत तसेच उद्यानांच्या बाहेर व्हीएमडी (डीजीटल फलक) बसविण्याचे तसेच वाय फाय सुविधा पुरविण्याची हजारो कोटी रुपयांची कामे देण्यात आली आहेत. या कंपनीलाच काम मिळावे यासाठी अटी शर्तींमध्ये बदलही करण्यात आला होता. तसेच कामाचे एस्टीमेटही एक हजार कोटी रुपयांनी वाढविण्यात आले होते. परंतू यावरून जोरदार टीका झाल्यानंतर योजनेच्या कामाचे रिएस्टीमेट करून खर्च एक हजार कोटी रुपयांनी कमी झाला होता. यावरूनच राज्यातील सत्ताधार्‍यांचा एल.ऍन्ड टी. या कंपनीवरील वरदहस्त दिसून येत आहे. त्यामुळेच या कंपनीने खोदाई केलेले सर्वाधीक रस्ते खड्डेमय झाल्यानंतरही त्यांच्यावर कुठलिच कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून केलेल्या रस्त्यांवरील खड्डयांसाठी दोष कोणाचा?

महापलिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांच्यावतीने करण्यात आलेले सुमारे १३०० रस्ते डीएलपीमध्ये आहेत.
या रस्त्यांचे अहवालही प्रशासनाने मागविले आहेत.
परंतू अद्यापही काही क्षेत्रिय कार्यालयांकडुन प्रतिसाद मिळालेला नाही.
क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स यादीतून करण्यात येणार्‍या रस्त्यांच्या कामांत
अनेकठिकाणी परस्पर जागा बदल करण्यात आले आहेत.
या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पावसाळी गटारे नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले आहेत.
स यादीतील रस्त्यांची कामे ही नगरसेवकांकडूनच सुचविण्यात येतात.
मात्र, महिन्याभरानंतरही स यादीतून केलेल्या रस्त्यांची यादीच तयार होत नसल्याने
प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Administration’s request to L&T (L&T) company, which has been digging for 24 hours water supply scheme in the last 2 years?

हे देखील वाचा :

Supreme Court On TV Channels Debates | वृत्त वाहिन्यांवरील ’डिबेट शो’ द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम; SC कडून सरकारची कानउघडणी, मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार

NCP And Shivsena On Shrikant Eknath Shinde | एक तर हे सरकारच बेकायदा, त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस! शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईकडून टीका

Mumbai AC Local Luggage Rack Crashed | एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; पश्चिम रेल्वेने घेतली गंभीर दखल

Related Posts