IMPIMP

Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी

by nagesh
Pune PMC Property Tax | The amount paid along with 40 percent tax should be returned, a request to the Municipal Commissioner

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – घरमालक राहत असलेल्या मिळकतींना पुणे महापालिकेकडून देण्यात येणारी मिळकत करातील (Pune PMC Property Tax) 40 टक्के सवलत बंद करण्यात आली होती. त्यामुळे पुणेकरांना 2018 पासूनची सवलतीची रक्कम थकबाकी दाखवून मिळकत कराची (Pune PMC Property Tax) बिले देण्यात आली होती. मात्र, याविरोधात सर्वपक्षांनी आवाज उठवल्यानंतर मिळकत करातील 40 टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra State Government) घेतला. मात्र, राज्य सरकारने निर्णय घेण्यापूर्वी ज्यांनी मिळकत कराची रक्कम भरलेली आहे. अशांना 40 टक्क्यांच्या सवलतीची रक्कम परत करावी अथवा पुढील बीलामध्ये समायोजित करावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे (Creative Foundation) अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रमकुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी घेतलेल्या बैठकीत प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली 40 टक्के मिळकत करवाढ (Pune PMC Property Tax) रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र मनपाच्या सातत्याने पाठविल्या जाणाऱ्या नोटिशींना घाबरून अनेकांनी ही वाढीव रक्कम भरल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य शासनाने ही अन्यायकारक वाढ रद्द केल्यामुळे 40 टक्के कर सवलत कायम करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास अनुसरून आधीच 40 टक्क्यासह कर भरलेल्यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करावी किंवा परत करावी अशी मागणी खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेने 2022-23 या आर्थिक वर्षापासून 2019 पासूनच्या फरकाच्या थकबाकीसह मोठ्या रकमेची
बिले नागरिकांना पाठवण्यास सुरुवात केली. यामुळे पुणेकरांमध्ये मोठा असंतोष पसरला.
यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व पक्षांनी मिळकत करात मिळणारी 40 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी
अशी मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्ष संपण्याच्या जेमतेम दोन
आठवडे बाकी असताना 40 टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय झाला.
त्यामुळे लाखो पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune PMC Property Tax | The amount paid along with 40 percent tax should be returned, a request to the Municipal Commissioner

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | एकुलत्या एका मुलाचा विरह सहन न झाल्याने आईने उचलले ‘हे’ पाऊल

Dr Raman Gangakhedkar | शाश्वत धोरणांचा अवलंब करीत सीएसआर अंतर्गत सामाजिक प्रश्न सोडवता येणे शक्य – पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर

Related Posts