IMPIMP

Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र

by nagesh
 Pune PMC To FDA Administration | FDA to make mandatory No Objection Certificate (NOC) from water supply department for traders at the time of food license renewal; LETTER FROM MUNICIPAL COMMISSIONER TO FDA ADMINISTRATION

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC To FDA Administration | शहरामध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून अन्न परवाना नूतनीकरण करणार्‍या व्यावसायीकांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे (NOC Of PMC Water Supply Department), असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) यांनी एफडीएच्या आयुक्तांना पाठविले आहे. (Pune PMC To FDA Administration)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहरातील अन्न पदार्थ विक्रेत्यांना एफडीए परवाना देते. तसेच परवान्यांचे नूतनीकरणही याच विभागाकडून करण्यात येते. पुर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन हे परवाने दिले जात होते. अन्न पदार्थ विक्रेत्या व्यावसायीकांना महापालिका मीटरद्वारे पाणी पुरवठा करते. आरोग्य विभाग हे परवाने देत असताना अथवा नूतनीकरण करत असताना व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असे. त्यामुळे व्यावसायीकांकडील पाणी पुरवठयाची बिलेही गोळा होण्यास मदत होत होती.

परंतू हे काम एफडीएकडे गेल्यानंतर तेथे पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंद करण्यात आले.
यामुळे व्यावसायीक पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
अनेक व्यावसायीकांची पाणीपट्टीची थकबाकी वाढत असून याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत आहे.
यामुळे एफडीए ने परवाना देताना आणि नूतनीकरणाच्यावेळी व्यावसायीकांकडून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे,
अशी सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी पत्राद्वारे केली आहे. (Pune PMC To FDA Administration)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune PMC To FDA Administration | FDA to make mandatory No Objection Certificate (NOC) from water supply department for traders at the time of food license renewal; LETTER FROM MUNICIPAL COMMISSIONER TO FDA ADMINISTRATION

हे देखील वाचा :

Pune Traffic Updates News | शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेला आकाशवाणी चौक ते दळवी हॉस्पिटल चौक रस्ता वाहतुकीसाठी खुला

Pune MahaVitaran News | आकुर्डीमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका ! तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड; नवीन वीजजोडणीसाठी रिघ

CM Eknath Shinde On Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts